''साताऱ्यात माझंच चालत''ची तोडफोड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

सातारा : फाइट या चित्रपटातील नायकाच्या तोंडी ''साताऱ्यात फक्त माझेच चालते'' हा डायलॉग आहे. हा डायलॉग उदयनराजे समर्थकांना रूचला नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी आज अभिनेता जीत मोरे यांची गाडी फोडली. 

फाइट या चित्रपटाची माहिती देण्यासाठी साताऱ्यातील राधिक पॅलेस हॉटलेमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक जिम्मी मोरीया, निर्माता ललित ओसवाल व अभिनेता जीत मोरे, अभिनेत्री सायली जोशी उपस्थित होते. पत्रकार परिषद सुरू असताना हॉटेलजवळ लावलेली जीत मोरे याची कार खासदार उदयनराजे समर्थकांनी फोडली. 

या प्रकारामुळे परिसरात गोंधळ निर्माण झाला. तसेच पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. यावेळी उदयनराजे समर्थकांनी साताऱ्यात फक्त उदयनराजेंचे चालते च्या घोषणा दिल्या. हा डायलॉग चित्रपटातून काढून टाकावा अन्यथा हा सिनेमा आम्ही चालू देणार नाही, अशाही घोषणा दिल्या. 

Web Title: udayan raje's followers attacked on jeet more's car