उदयनराजे रामराजेंवर पुन्हा भडकले! 

उदयनराजे रामराजेंवर पुन्हा भडकले! 

सातारा : नीरा- देवघरच्या खंडाळा, फलटण तालुक्‍यांतील उजव्या कालव्याचे काम सुमारे 11 वर्षांत वाघोशीच्या पुढे सरकले नाही. त्यामुळे डोंगरी भागातील जनता पाण्यापासून वंचित राहली. हे जर काम झाले असते तर खंडाळा, फलटण तालुक्‍यातील शिवारे भिजली असती; परंतु कालव्याची कामे "भगीरथ' ऊर्फ "भोगीरथा'ने रखडवली. म्हणूनच निषेधच करायचा असेल तर "त्यांचा' केला पाहिजे, अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता केली आहे. 

अहिरे व तरडगाव येथे रास्ता रोको, साखरवाडी व राजुरी येथे निषेध फेऱ्या काढून उदयनराजेंचा निषेध करण्यात आला. त्या पार्श्‍वभूमीवर दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात उदयनराजेंनी म्हटले आहे, की नीरा- देवघर धरणाचे काम 2008 मध्ये पूर्ण झाले आहे. या धरणाचा उजवा कालवा एकूण 198 किलोमीटरचा आहे. त्यापैकी 65 किलोमीटर कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. भोर तालुक्‍यानंतर खंडाळा आणि पुढे फलटण तालुक्‍यातील उजव्या कालव्याचे काम सुमारे 11 वर्षांत वाघोशीच्या पुढे सरकले नाही. त्यामुळे नीरा उजव्या कालव्यावरची डोंगरी भागातील जनता पाण्यापासून वंचित राहिली.

कोणताही माणूस एक, दोन नव्हे तर तब्बल 11 वर्षे स्वतःचं घर उपाशी ठेवून दुसऱ्या घरच्या व्यक्‍तींना जेऊ घालत असेल, तर त्याच्यासारखा "कृतघ्न' माणूस शोधून सापडणार नाही. असा माणूस "भगीरथ' नव्हे तर "भोगीरथ' म्हणून ओळखला जायला लागला आहे. त्यांची तळी उचलण्यासाठी काही लोक आमचा निषेध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक नीरा- देवघरचे हक्‍काचे पाणी भोर, खंडाळा, फलटण व माळशिरस तालुक्‍यांसाठी मिळू नये उजव्या कालव्याची कामे रखडवली. आता नीरा- देवघर उजव्या कालव्याचे पाणी खंडाळा तालुक्‍यातील लोणंद, वाघोशी आदी दहा गावांना, तर फलटण तालुक्‍यातील पाडेगाव आदी 61 गावांना मिळेल. ही सर्व गावे त्यांच्या हक्‍काच्या पाण्यापासून वंचित ठेवण्यात आली होती. 

खंडाळा, फलटण तालुक्‍यांला स्वतःच्या हक्‍काच्या पाण्यापासून वंचित ठेवून, या "भोगीरथा'ने जनतेचा अपमान केला आहे. त्याबदल्यात त्यांनी मंत्रिपद आणि पुढे सभापतिपद पदरात पाडून घेतले. अशा भोगवादी, विलासी वृत्तीत रमणाऱ्याने ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड नुकसान केले आहे. आजपर्यंत पाण्यापासून वंचित ठेवलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणाला तेच जबाबदार आहेत. शेतकऱ्यांनी सोसलेल्या वेदनांच्या शापांमुळे त्यांचा पालापाचोळा होईल, अशी टीकाही उदयनराजेंनी केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com