उदयनराजेंचे उद्या सिमाेल्लंघन ; दसरा साेहळ्याची तयारी पुर्ण

उदयनराजेंचे उद्या सिमाेल्लंघन ; दसरा साेहळ्याची तयारी पुर्ण

सातारा : साताऱ्यातील दसरा सोहळा हा खूप जूना आहे. संस्थान खालसा झाली असली तरीही सातारचे राजघराणे आणि नागरीक यांच्यात आजही अतूट नाते आहे. सिमोल्लंघन झाल्यानंतर जनतेसमवेत दसरा साजरी करण्याची परंपरेची सर्वांनी मिळून केलेली जपणूकच म्हणावी लागेल.

उद्या (मंगळवार, ता. 8) होणाऱ्या या सोहळ्याची जलमंदिर पॅलेस येथे तयारी पुर्ण झाली आहे. प्रतिवर्षा प्रमाणे यंदाही विजयादशमी दिवशी सिमोल्लंघन मोठ्या दणक्‍यात साजरे करण्याचा आग्रह उदयनराजेंकडे कार्यकर्त्यांचा दिसत आहे. गावागावातून मोठ्या संख्येने लोक यावेत यासाठी नियोजन केले जात आहे.

जिल्हा परिषद, पंचायत समिती, पालिका तसेच विविध ग्रामपंचायतीचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्यांनी सिमोल्लंघनाची जय्यत तयारी केली आहे. खरं तर उदयनराजे कित्येक वर्ष सिमोल्लंघनासाठी जातात. परंपरेप्रमाणे पूजा-अर्चा करतात. जनतेच्या शुभेच्छा स्विकारुन त्यांच्यासमवेत सोने लूटले जाते.

यंदा हा कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झालेला दिसतोय. याचे मुख्य कारण म्हणजे लोकसभेची पोटनिवणूकीचे आहे अशी चर्चा आहे. त्यासाठीच सध्या तरी सोशल मिडीयातून सिमोल्लंघनाचे पुर्वीचे व्हिडिओ चित्रीकरण व्हायरल केले जात आहे. 


- सिमोल्लंघनाची प्रथा- परंपरा 

साताऱ्यातील दसरा सोहळा हा खूप जूना आहे. सातारचे राजघराणे आणि नागरीक यांच्यात आजही अतूट नाते आहे. हा सोहळा खूप जूना आहे. पण मोलाचा आहे. साताऱ्याच्या परंपरेची ती सर्वांनी मिळून केलेली जपणूक आहे. संस्थान खालसा झाले. राजा ही उपाधी राहिली. प्रजेची ओळख शहरवासी अशी झाली. तरीही साताऱ्याचा दसऱ्याचा दिवस मात्र नागरीकांसाठी आजही परंपरेने साजरा केला जातो. नागरीक राजघराण्यासमवेत दसऱ्याचे सोने लूटून त्याक्षणाचे साक्षीदार होतात.छत्रपती संभाजी यांचे पुत्र छत्रपती शाहू यांनी सातारा शहर वसविले. त्यामुळे या शहरावर संस्थाकालीन प्रथा, परंपराचा या शहरावर पगडा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले हे सातारा शहरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे आजही साताऱ्यामध्ये संस्थाकालीन प्रथा परंपरा जोपसाल्या जातात. साताऱ्यातील श्री भवानी तलावरीची मिरवणुक व त्यानंतरचे सिमोल्लंघन असा हा दसऱ्याचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जातो.
 
प्रथेप्रमाणे जलमंदिर पॅलेस या उदयनराजेंच्या राजवाड्यातून श्री भवानी तलवारीची पालखी मिरवणुक काढली जाते. अग्रभागी सनई-चौघडा, शिंग-तुताऱ्यांचा समूह, राजघराण्यातील मानकरी, नऊवारी साडी नेसलेल्या मुली, तसेच फेटाधारी युवक असतात. या मिरवणुकीत उदयनराजे, त्यांचे चिरंजीव वीरप्रतापसिंहराजे यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी होतात. ही मिरवणुक जलमंदिर पॅलेस येथून राजवाडा, राजपथमार्गे पोवई नाक्‍यावर (पुर्वीची सातारा शहराची सिमारेषा) येते.

तेथे उदयनराजे श्री भवानी तलवारीचे तसेच शमीच्या पानांची शास्त्रशुद्ध पूजन करतात. त्यानंतर सिमोल्लंघन होते. सोने लूटले जाते. नागरीक एकमेकांना शुभेच्छा देतात. हा ऐतिहासिक परंपरा ओळखला जाणारा सोहळा पाहण्यासाठी शेकडो सातारकरांची गर्दी असते.

उदयनराजे पून्हा जलमंदिर पॅलेस येथे आल्यानंतर त्यांचे औक्षण केले जाते. श्री भवानी देवीच्या महाआरती झाल्यानंतर राजमाता कल्पनाराजे, उदयनराजे, दमयंतीराजे, वीरप्रतापसिंहराजे, नयनताराराजे हे सातारकरांकडून दसऱ्याच्या शुभेच्छा स्विकारतात. हा सोहळा खूप जूना आहे. पण मोलाचा आहे. साताऱ्याच्या परंपरेची ती सर्वांनी मिळून केलेली जपणूक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com