कोरेगावात दंडेलशाही चालू देणार नाही - खासदार उदयनराजे भोसले

एकसळ (ता. कोरेगाव) - येथे रविवारी झालेल्या बैठकीत बोलताना उदयनराजे भोसले. त्या वेळी रवी साळुंखे, सुनील खत्री, ॲड. पांडुरंग भोसले, ॲड. विजयसिंह शिंदे, लक्ष्मण भिलारे, विठ्ठलराव कदम आदी.
एकसळ (ता. कोरेगाव) - येथे रविवारी झालेल्या बैठकीत बोलताना उदयनराजे भोसले. त्या वेळी रवी साळुंखे, सुनील खत्री, ॲड. पांडुरंग भोसले, ॲड. विजयसिंह शिंदे, लक्ष्मण भिलारे, विठ्ठलराव कदम आदी.

कोरेगाव - वाट्टेल त्या परिस्थितीत दंडेलशाही चालू देणार नाही. कोरेगाव म्हणजे काय चेष्टा वाटली काय?’ तुम्ही तुमचे ठरवा काय करायचे, काय नाही ते. आपण जो निर्णय घ्याल तो मला मान्य राहील व तुम्हाला संपूर्ण पाठिंबा राहील, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांची पाठराखण केली. 

आमदार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध बंड पुकारत उमेदवार बदलण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी विचार मंचद्वारे एकत्र आलेल्या राष्ट्रवादीतील नाराजांच्या एकसळ (ता. कोरेगाव) येथील बैठकीत खासदार उदनराजे भोसले यांनी अचानक एंट्री करून कोरेगाव मतदारसंघातील राजकारणाला धक्का दिला. प्रा. अनिल बोधे यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केल्यानंतर उदयनराजे म्हणाले, ‘‘प्रश्‍न राजकारणाचा कधीच नव्हता व कधीच नसणार. गेली २०-२५ वर्षे कशी गेली, मला माहीत नाही. पण, आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केले. तुमच्या विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही व देणारही नाही. प्रेम, नाते जुळले पाहिजे. ते मागून, पुस्तकांत वाचून मिळत नाही. कोरेगावकर एकत्र येत नाहीत, याची खंत वाटते. ऐनवेळेस कोणाचा बैल इकडे, कोणाची गाय तिकडे, तर कोणाची म्हैस कोठे, अशी परिस्थिती असते. पण, विश्‍वासाला तडा गेला की लोकं पाठ फिरवतात. प्रत्येक ठिकाणी मी-मी कशाला? जेव्हा काम काढायची वेळ येईल, तेव्हा कामच काढणार.’’ 

सुनील खत्री म्हणाले, ‘‘उदयनराजेंनी आमचे मनोबल वाढवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कोरेगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार बदलण्याची मागणी लावून धरू.’’ लक्ष्मण भिलारे, अजय कदम, हिंदूराव भोसले यांची भाषणे झाली. ॲड. पांडुरंग भोसले यांनी स्वागत केले. या वेळी उदयनराजे यांच्या विकास निधीतून गावात झालेल्या रस्त्याचे उद्‌घाटनही करण्यात आले.

तुमच्या विश्‍वासाला तडा जाऊ दिला नाही व देणारही नाही. प्रेम, नाते जुळले पाहिजे. ते मागून, पुस्तकांत वाचून मिळत नाही. कोरेगावकर एकत्र येत नाहीत, याची खंत वाटते. 
- खासदार उदयनराजे भोसले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com