Udayanraje speaks with journalist at Satara
Udayanraje speaks with journalist at Satara

मी स्वाभिमान सोडलेला नाही; बांगड्याही भरलेल्या नाहीत : उदयनराजे 

सातारा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणुक 21 ऑक्‍टोबरला होणार असल्याचे आज (मंगळवार) जाहीर झाले. त्यानंतर साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस येथे समर्थकांनी गर्दी केली. प्रत्येकाच्या गाठीभेटी घेतल्यानंतर उदयनराजेंना पत्रकारांनी गाठले. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नांवर उदयनराजेंनी कधी भावूक होऊन तर बेधडक उत्तर दिले. 

उदयनराजे म्हणाले, मी लोकशाही मानणारा आहे. मी काय इकडे-तिकडे करणार नाही. आज प्रत्येकजण तोंडसूख घेत आहे. असो. ज्यांना कोणाला काय वाटत असेल त्यांनी मी जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही जागा निवडा, कोणी काय केले याचा लोखाजोखा जनतेसमोर मांडा. आयुष्याची ऐन तारूण्याची वर्ष घालवली. साहेबांविषयी आदराने बोलतो, खूप आदर आहे. त्यांच्याविषयी, नवाब मलिकांविषयी ही आदर आहे. कधीतरी अंतर्मनात झाकून बघा मग कळेल. मी स्वाभिमान सोडलेला नाही. कोणी काहीही बोलायचे आणि मी ऐकूण घ्यायचे मी बांगड्या भरलेल्या नाहीत. हिंमत असेल तर चॅलेंज घ्या आणि समोरासमोर या... कोणीपण या बास. बोललो ते बोललो. झाल्यात माझ्यावर केसेस. फक्त लोकांना केसेस माहिती आहेत. त्या का झाल्या. अन्यायाविरोधात आवाज उठविला म्हणून केसेस झाल्या. तुरूंगात गेलो. हौस नव्हती. या लोकांना नौटंकी वाटते. नौटंकी तर नौटंकी. उगीच लोक नाही प्रेम करत. अहो न बोलण्यासारखे आहे. यांच्या बोलण्याने माझे पोटभरुन कौतुक केले त्यांचे आभार मानतो. लहानपणी गालावर काळा ठिपका लावतात, ते दृष्ट लागू नये म्हणून ते केले जाते. त्यांचे अनंत उपकार माझ्यावर आहेत.  

पोटनिवडणुकीत पवार साहेबांचे नाव पुढे येत आहे या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले ते उभे राहिले तर अर्ज भरणार नाही. पण त्यांनी एकच करावे दिल्लीतील बंगला आणि गाडी द्यावी.

वाईट वाटते का पवार साहेबांकडून तुमच्यावर टिका होते? या प्रश्नावर उदयनराजे म्हणाले, ते आदरणीय कालपण होते आजपण आहेत आणि भविष्यातही राहतील. डॅडींनंतर प्रेम दिले ते त्यांनी दिले असे भावूक होऊ उदयनराजेंनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले चांगले आहे, खरच त्यांनी उभे राहावे, देवा शपथ सांगतो, मी बोंबलत हिंडायला मोकळा. एकदा आजमावून बघा. शर्टच्या आत हृदयाकडे बघून एकदा आजमावून बघा असे म्हणत त्यांनी कॉलर उडवली स्टाईल ईज स्टाईल. त्यांनी सांगू देत फक्त... नाही ऐकले तर कायमपण. मित्र आहेत देवेंद्र, गिरिष, काय मागून मागेन. मी काहीही मागितले नाही. केवळ एकच मागितले...साताऱ्यासाठी हे करा ते करा...अजून काय. 

माझ्या कॉलरची चर्चा कशाला. कॉलर माझी आहे, चावीन नाहीतर फाडून टाकीन. इश्‍युबेस राजकारण करण्याऐवजी इश्‍युबेस समाजकारण करा लोक तुम्हाला दुवा देतील. 

निवडणूक सोपी जावी यासाठी रणनिती कशा पध्दतीची असेल... पिक्‍चर बघितलाय का अनासपुरेचा बास त्यावरून घ्या... साठवून ठेवलेत एक एक रूपया.. ही स्किम सांगू नका. प्रत्येक पक्षातील कार्यकर्ता तुमचा प्रचार करताना आम्ही पाहिले आहे त्यावर उदयनराजे म्हणाले माझा कोणीही कार्यकर्ता नाही. ते सर्व माझे मित्र आहेत. ते करतात प्रेमापोटी करतात. परत तुम्ही म्हणाल राजेशाही गेली यांच्या रुबाबाने. राजेशाही असती तर एवढ्या रेप केसेस होऊन दिल्या नसत्या सरळ गोळ्या घालून टाकल्या असत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com