Vidhan Sabha 2019: पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाणून घेतले महापालिका, जिल्हा परिषदेचे बलाबल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

एकाच दिवसात जिल्ह्यात पाच सभा घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापुरात हॉटेल बालाजी सरोवरमध्ये मुक्काम केला. सोलापूर मुक्कामी ठाकरे यांनी सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल जाणून घेऊन पुढील नियोजनाच्या अनुषंगाने संवाद साधला. 

विधानसभा 2019 :

सोलापूर - एकाच दिवसात जिल्ह्यात पाच सभा घेतल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी सोलापुरात हॉटेल बालाजी सरोवरमध्ये मुक्काम केला. सोलापूर मुक्कामी ठाकरे यांनी सोलापूर महापालिका आणि जिल्हा परिषदेमधील पक्षीय बलाबल जाणून घेऊन पुढील नियोजनाच्या अनुषंगाने संवाद साधला. 

संपर्कप्रमुख तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांच्यासह काही मोजक्‍या पदाधिकाऱ्यांशी पक्षप्रमुख ठाकरे यांनी संवाद साधला. जिल्ह्यातील सर्व मतदारसंघांतील आढावा घेतला. महापालिकेतील नेमकी स्थिती काय आहे, हे त्यांनी जाणून घेतले. जिल्हा परिषदेतील बलाबलची विचारणा केली. पक्षवाढीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. गद्दारी केलेल्या उमेदवारांविषयी अधिक बोलणे टाळून दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. दरम्यान, "शहर मध्य'चे उमेदवार दिलीप माने यांच्या होटगी रोडवरील निवासस्थानी पक्षप्रमुख ठाकरे यांनी भेट दिली. तिथेही निवडणुकीच्या अनुषंगाने संवाद झाला. मंगळवारी सकाळी खासगी विमानाने ठाकरे मुंबईला रवाना झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray interacted with some officer in Solapur Municipal Corporation and Zilla Parishad