मंगळवेढ्यात राजकीय चर्चांना उधाण

हुकूम मुलाणी 
सोमवार, 24 डिसेंबर 2018

मंगळवेढा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याबाबत पंढरपुरात महासभेसाठी येत आहेत. सध्या चर्चा राममंदीराची असली तरी यानिमित्ताने या मतदारसंघातील आगामी विधानसभा उमेदवाराचे धनुष्य कुणाच्या हाती देतात याची उत्सुकता लागून राहिली.

मंगळवेढा - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राम मंदिर बांधण्याबाबत पंढरपुरात महासभेसाठी येत आहेत. सध्या चर्चा राममंदीराची असली तरी यानिमित्ताने या मतदारसंघातील आगामी विधानसभा उमेदवाराचे धनुष्य कुणाच्या हाती देतात याची उत्सुकता लागून राहिली.

पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा प्रभाव कमी आहे. अशा परिस्थितीत 2014 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मंगळवेढ्याच्या समाधान आवताडे यांनी चाळीस हजार इतके मतदार मिळवले त्यांचा जरी पराभव झाला असला तरी शिवसेनेच्या मतात वाढ झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अलीकडच्या चार वर्षांमध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ व स्थानिक नेत्यांनी या भागांमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढीचे वाढण्याच्या दृष्टीने म्हणावे तितके प्रयत्न केले नाही त्यामुळे या भागात शिवसेनेचे असलेले अस्तित्व मोठ्या प्रमाणात वाढण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. पण सध्या आवताडे विधानसभेचे दावेदार आहेत त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. शिवाय कुरूल गटाच्या जि प सदस्य शैला गोडसे यांना तानाजी सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश घेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना या मतदारसंघात चौथा पर्याय करून दिला. गोडसे यांनी शिवसेना प्रवेश केल्यापासून या भागातील शिवसेनेची पुनर्रचना केली पदावर राहून पक्षवाढीसाठी प्रयत्न न केलेल्यांना बाजूला करत नवीन संघटना बांधण्याचे प्रयत्न सुरू केले त्यांच्या कुरूलच्या जि. प. सदस्य असल्या तरी मंगळवेढा मधील विविध विकास कामे सामाजिक उपक्रम समस्यांच्या संदर्भात झालेल्या आंदोलनाबाबत त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि नवरात्र महोत्सव काळात सर्व मंडळांना भेटी देऊन संपर्क ठेवला. या मतदारसंघात आमदारकीसाठी असलेले अन्य तिघे इच्छुक हे साखर कारखानदार आहेत.गोडसे या साखर कारखानदार नसल्या तरी त्याच्या मागे भैरवनाथ परिवार आधार असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत म्हैसाळच्या पाण्यासाठी आंदोलन केले त्यामध्ये त्यांना अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याबाबत अपेक्षित सहकार्य केले नसले तरी, त्यांचे आंदोलन एक महिला म्हणून प्रभावी ठरले. त्यामुळे यापुढील काळात त्या शिवसेनेचा उमेदवार असणार आहेत. अशी चर्चा या भागात सुरू आहे. शेवटी उमेदवारीबाबत निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना असल्याने ते या महासभेतून आमदारकीच्या उमेदवारीचे शिवधनुष्य कुणाच्या हातात देतात. याकडे मात्र शिवसैनिकांसह तालुक्यातील जनतेचे लक्ष पंढरपुरातील महासभेतील पक्षप्रमुख उध्दव ठाकरेच्या भाषणाकडे लागले आहे.

Web Title: Since Uddhav Thakre will come to Pandharpur