शिवेंद्रसिंहराजेंचे व्हिक्‍टरीचे चिन्ह, तर उदयनराजेंची प्रसन्न मुद्रा

Satara
Satara

सातारा : पालिकेच्या निवडणुकीपासून दूरावलेले साताराचे दोन्ही नेते आज (रविवारी) एका कार्यक्रमात छायाचित्रकरांना पोझ देण्यासाठी क्षणभर का होईना एकत्र आले. या छायाचित्रात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे व्हिक्‍टरीचे चिन्ह आणि खासदार उदयनराजे भोसले यांची प्रसन्न मुद्रा सातारकरांना खूप काही सांगून जात आहे.

सातारा जिल्ह्यात शनिवारपासून (ता.26) सातारामधील राजकारणात एक वेगळीच उलथापालथ दिसून आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हेलिकॉप्टरने सातारामध्ये आले. त्यांसाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वाहन तयार होते. श्री. पवार यांचे हेलीपॅडवर स्वागत झाल्यानंतर त्यांनी खासदार उदयनराजे भोसलेंना बोलावून या गाडीत बसा असे सांगितले. कार्यक्रमस्थळी पवार साहेबांसोबत शिवेंद्रसिंहराजे, उदयनराजे आणि आमदार शशिकांत शिंदे हे एकाच गाडीतून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यानंतर दिवसभर वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी या दोन्ही नेत्यांची उपस्थिती होती. परंतु त्यांच्यात संवाद नव्हता. दरम्यान शहरात शनिवारी (ता.26) दिवसभर राजे एकत्र आले...मनोमिलन झाले...असे प्रत्येकाच्या कानावर पडत होते. 

आज (रविवार) सकाळच्या प्रहरी यवतेश्‍वर येथे एका कार्यक्रमास दोन्ही नेते आले होते. विशेष म्हणजे छायाचित्रकरांना पोझ देण्यासाठी क्षणभर का होईना दोन्ही नेते एकत्र आले. छायाचित्र काढताना शिवेंद्रसिंहराजेंचे व्हिक्‍टरीचे चिन्ह आणि उदयनराजेंची प्रसन्न मुद्रा हे खूप काही सांगून जात आहे. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय मनोमिलन झाले आहे हे त्यांच्याशिवाय कोणीच सांगू शकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com