साताऱ्यात ना उदयनराजे दिसले ना डीजे पण शिवेंद्रसिंहराजे नाचले

सिद्धार्थ लाटकर 
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

खासदार उदयनराजे भोसले हे रविवारी दुपारपासून पुण्यात वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठकांमध्ये होते. या बैठका रात्री उशिरा पर्यंत सुरु होत्या. यामुळे ते साताऱ्यात आले नाहीत. रात्रीअपरात्री साताऱ्याच्या रस्त्यांवर फिरणारे उदयनराजे रविवारी किती ही वाजता साताऱ्यात येऊ शकले असते असा प्रश्‍न "सकाळ'च्या प्रतिनिधीने समर्थकांना विचारला असता "महाराज' आले असते तर मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात किती अडचणी निर्माण झाल्या असते ते तुम्ही जाणता असे समर्थकांनी नमूद केले.

सातारा : मंगळवार तळे माझ्या मालकीचे आहे. वाटेल त्या परिस्थितीत मूर्ती विसर्जन तेथेच होणार, साताऱ्यात डि.जे. वाजणारच असे इशारा वारंवार प्रशासनास देणारे खासदार उदयनराजे भोसले रविवार (ता.23) संपन्न झालेल्या गणेशोत्सव विजर्सन मिरवणुकीत आलेच नाही. त्याहूनही मंडळांनी ना... डि.जे. लावले...ना मंगळवार तळ्यात मुर्तींचे विसर्जन केले. न्यायालयाची बंधने पाळून विसर्जन मिरवणुक शातंतेत झाली खरी पण गेली काही वर्षे विसर्जन मिरवणुकीत मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, बहुचर्चेत गाण्यांच्या ठेक्‍यांवर नाचणारे उदयनराजे यांच्या अनुपस्थितीची चर्चा सर्वत्र राहिली. दरम्यान ढोल ताशांच्या गजरावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मात्र गणेश भक्तांच्या समवेत काही काळ नाचण्याचा आनंद लुटला. 

गणेशोत्सवापुर्वी साताऱ्यातील गणेश मूर्तींचे विसर्जनाच्या तळ्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. गणेश मंडळांनी मंगळवार तळ्यात विसर्जन न करता शहराबाहेरील कण्हेर खाणीत आणि गोडोलीतील कृत्रिम तळ्यात करावे, असे नियोजन प्रशासन करीत होते. परंतु खासदार उदयनराजेंनी पालिकेच्या सभागृहात शहरातील गणेश मंडळ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार अशी भूमिका स्पष्ट केली.

या बैठकीतच तसेच यापुर्वी मंडळांनी डि.जे लावल्यास काय हरकत आहे. डि.जे. वाजलाच पाहिजे अशी भुमिका जाहीर करताना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या कार्यक्षेत्रात झालेल्या सनबर्न फेस्टीव्हलवर भाष्य केले होते. त्यानंतर प्रशाकीय हालचाली गतिमान झाल्या. जिल्हा प्रशासनाने मध्यवर्ती ठिकाणी कृत्रिम तळे खोदले तर दूसरीकडे पोलिस प्रशासनाने जिल्ह्यात डि.जे. यंत्रणा जप्त करण्याचा धडाकाच लावला. परिणामी रविवारीची गणेश विसर्जन मिरवणुकी शांततेत पार पडली. 

खासदार उदयनराजे भोसले हे रविवारी दुपारपासून पुण्यात वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठकांमध्ये होते. या बैठका रात्री उशिरा पर्यंत सुरु होत्या. यामुळे ते साताऱ्यात आले नाहीत. रात्रीअपरात्री साताऱ्याच्या रस्त्यांवर फिरणारे उदयनराजे रविवारी किती ही वाजता साताऱ्यात येऊ शकले असते असा प्रश्‍न "सकाळ'च्या प्रतिनिधीने समर्थकांना विचारला असता "महाराज' आले असते तर मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्यात किती अडचणी निर्माण झाल्या असते ते तुम्ही जाणता असे समर्थकांनी नमूद केले.

Web Title: Udyanraje Bhosale in particiapate in Ganpati visarjan Satara