कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे

कॉलर माझी आहे, मी चावीन नाहीतर फाडून टाकेन : उदयनराजे

मुंबई : उदयनराजे भोसले आपल्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहेत. कॉलर उडवण्याच्या स्टाईलवरुन त्यांच्यावर अनेकदा टीकाही होते. टीकाकारांना उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, “ही माझी राजे स्टाईल आहे. कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकेन. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. काल, आज आणि भविष्यातही ते माझ्यासाठी आदरणीय नेतेच राहतील. वडिलांनंतर शरद पवारांनीच मला प्रेम दिले.

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी साताऱ्यातून शरद पवार उभे राहिले, तर मी फॉर्म भरणार नाही. काल, आज आणि भविष्यातही ते माझ्यासाठी आदरणीय नेतेच राहतील. वडिलांनंतर शरद पवारांनीच मला प्रेम दिले, असे सांगताना उदयनराजे भोसले यांना अश्रू अनावर झाले.  पण, लगेचच स्वतःला सावरत त्यांनी "पवार साहेब उभे राहणार असतील, तर त्यांनी एक करावे, त्यांचा दिल्लीतील बंगला आणि गाडी वापरायची मुभा मला द्यावी,' अशी कोपरखळीही त्यांनी मारली. सातारा लोकसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

राष्ट्रवादी सोडल्यानंतर उदयनराजे यांच्यावर सर्व बाजूने टीकेची झोड उठली आहे. यासंदर्भात विचारले असता ते म्हणाले, ""पवार साहेबांविषयी आदराने बोलतो, त्यांच्याविषयी खूप आदर आहे. नवाब मलिकांविषयीही आदर आहे. पण, कधीतरी अंतर्मनात झाकून बघा, मग कळेल. मी स्वाभिमान सोडलेला नाही. कोणी काहीही बोलायचे आणि मी ऐकून घ्यायचे. मी बांगड्या भरलेल्या नाहीत. हिंमत असेल तर माझे चॅलेंज स्वीकारा आणि समोरासमोर या. माझ्यावर केसेस झाल्या त्या लोकांना माहीत आहेत. अन्यायाविरोधात आवाज उठविला म्हणून माझ्यावर केसेस केल्याने मी तुरुंगात होतो. माझे ऐन तारुण्यातील 22 महिने वाया गेले. या लोकांना ही सर्व नौटंकी वाटते. नौटंकी तर नौटंकी..उगीच लोक माझ्यावर प्रेम करत नाहीत.'' 
साताऱ्याच्या पोटनिवडणुकीत पवारांचे नाव येत आहे. यावर ते म्हणाले, ""शरद पवार उभे राहिले तर मी फॉर्म भरणार नाही. पण, त्यांनी एकच करावे, दिल्लीतील त्यांचा बंगला आणि गाडी तेवढी वापरायची मुभा मला द्यावी.'' 

पवारांकडून तुमच्यावर टीका होतेय, याचे वाईट वाटते का, याचे उत्तर देताना ते म्हणाले, ""ते माझे आदरणीय नेते आहेत. काल, आज आणि भविष्यातही ते माझे आदरणीयच राहतील. वडिलांनंतर पवारांनीच मला प्रेम दिले.'' हे म्हणत असताना भावनिक होत त्यांना अश्रू अनावर झाले. पुढे डोळे पुसतच ते म्हणाले, ""असे होणार असेल तर चांगले आहे. खरंच त्यांनी उभे राहावे. देवा शपथ सांगतो, मी बोंबलत हिंडायला मोकळा. एकदा आजमावून बघावे. याला म्हणतात स्टाइल ईज स्टाइल..''असे म्हणत त्यांनी कॉलर उडविली. 

देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्याशी माझी जुनी मैत्री आहे. मी त्यांना काहीही मागितले नाही. साताऱ्यासाठी सर्व काही करा, एवढेच मागितले. पण, एक अख्खी पिढी वाया गेली. जनता तुम्हाला विचारणार ना, ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यावेळी सत्ता आमचीच होती, काय केले? त्यामुळे चर्चा कशाला? कॉलर माझी आहे, मी ती चावीन नाहीतर फाडून टाकीन.'' इश्‍युबेस्ड राजकारणाऐवजी समाजकारण करा, लोक दुवा देतील, असा सल्लाही त्यांनी दिला. 
 

अनासपुरेंचा पिक्‍चर बघितलाय का? 
निवडणूक सोपी जावी म्हणून तुम्ही कोणती रणनीती आखणार आहात, या प्रश्‍नावर उदयनराजे म्हणाले, ""तुम्ही मकरंद अनासपुरेंचा पिक्‍चर बघितलाय का? बस्स.. त्यावरून जाणून घ्या. साठवून ठेवलेला एक एक रुपया...'' पण ही स्किम कोणाला सांगू नका, असे म्हणत ते थोडे हसले. "माझेही कार्यकर्ते आणि मित्र आहेत. ते प्रेमापोटी माझे काम करतात,' असे त्यांनी नमूद केले. 

...तर त्यांना गोळ्या घातल्या असत्या 
एका प्रश्‍नाला उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, ""मी लोकशाही मानणारा आहे. राजेशाही गेली असे म्हणतात. पण, जर राजेशाही असती, तर एकही रेप केस होऊ दिली नसती. त्यांना गोळ्या घातल्या असत्या.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com