पवारसाहेब, फसवाफसवी करु नका नाहीतर... : उदयनराजे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व उदयनराजेंचा संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिक नेते आणि उदयनराजे असे दोन गट पडले आहेत. उदयनराजे विरोधी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. या नेत्यांत गेल्या वर्षभरापासून सातत्याने संघर्ष सुरु आहे.

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि स्थानिक नेते यांच्यात सुरु असलेल्या वादाचे प्रत्यंतर आज पक्षप्रमुख शरद पवार यांच्यासमोर पहायला मिळाले. उदयनराजेंनी विश्रामगृहावर पवारांची भेट घेतली आणि 15 मिनिटे बंद दरवाज्याआड चर्चा केली, त्यानंतर ते तणावात बाहेर आले.

नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व उदयनराजेंचा संघर्ष झाला. त्यानंतर स्थानिक नेते आणि उदयनराजे असे दोन गट पडले आहेत. उदयनराजे विरोधी गटाचे नेतृत्व रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे. या नेत्यांत गेल्या वर्षभरापासून सातत्याने संघर्ष सुरु आहे. उदयनराजेंना उमेदवारी देवू नये, असा उदयनराजे विरोधकांचा पवारांकडे आग्रह आहे. गेली चार दिवस उदयनराजे व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात खालच्या पातळीवर टीकाटिप्पण्णी झाली आहे. यापार्श्‍वभूमीवर आजच्या घडामोडी घडल्या आहेत.

पवार आज सातारा दौऱ्यावर आहेत. सकाळी उदयनराजे पवारांना भेटले. चर्चेनंतर काहीशा गंभीर चेहऱ्याने ते बाहेर आले. पत्रकारांनी त्यांना या भेटीसंबंधी विचारल्यावर ते म्हणाले, "कडकडून मिठी मारली आणि म्हणाले तुम्ही आमचेच आहात. शरद पवार यांचे वय पाहता त्यांच्याएवढा कोण मोठा नेता नाही. आपल्याला लाजवेल असे ते काम करतात. काय बोलणार. एवढच की, फसवाफसवी करु नका, नाहीतर मलापण कळतं."

Web Title: Udyanraje Bhosale talked about Sharad Pawar meeting in Satara