उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजेंना जावळी बंदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

सातारा : जिल्हा परिषदेच्या मतदान प्रक्रियेदरम्यान मंगळवारी (ता. 21) खासदार उदयनराजे भोसले जावळी तालुक्‍यात मतदान केंद्रांना भेटी देण्यासाठी गेले होते. त्या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थक आणि खासदार उदयनराजे भोसले समर्थकांमध्ये राडा झाला होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर खासदार व आमदार भोसले या दोन्ही नेत्यांसह 25 समर्थकांना 24 फेब्रुवारीपर्यंत जावळी तालुक्‍यात प्रवेश बंदी केली आहे. याबाबतची नोटीस पोलिस उपअधीक्षक आर.आर.पाटील यांनी बजावल्या आहेत.

जावळीत झालेल्या राड्यात पोलिसांच्या गाडीच्या काचा फुटल्या, तसेच एक पोलिस कर्मचारी जखमी झाला होता. वसंतराव मानकुमरे यांनी खासदार भोसले यांच्या समर्थकांविरुद्ध मेढा पोलिसांत तक्रार दिली होती. उदयनराजे यांच्या समर्थकांनी आपल्या पत्नीला व कार्यकर्त्यांना मारहाण केली, तसेच या वेळी पत्नीचे मंगळसूत्र चोरीला गेले, असे त्यात म्हटले होते. याप्रकरणी खासदार भोसले व समर्थकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.दरम्यान पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करून एका पोलिसाला जखमी केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती वसंतराव मानकुमरे, त्यांचा मुलगा स्वप्नील (दोघे रा. कावडी) आणि त्यांचा गाडीचालक विक्रम शिंदे (रा. आखाडे) या तिघांना मेढा न्यायालयाने दोन दिवसांची (24 फेब्रुवारीपर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Web Title: udyanraje bhosle and shivendrasingh bhosle and jawali