भोसले समर्थकांमधील धुसफुशीनंतर बाजारपेठा बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

सातारा- राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीचेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये जावळीत मंगळवारी (ता. 21) झालेल्या धुसफुशीनंतर आज (बुधवार) जावळी तालुक्‍यातील प्रमुख गावांच्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा बंद आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले समर्थकांनी पूकारल्याचा दावा केला आहे.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांच्या गटांमध्ये मंगळवारी (ता. 21) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान राडा झाला. उदयनराजे भोसले यांच्या वाहनांच्या ताफ्यावर शिवेंद्रसिंहराजे यांच्या समर्थकांनी दगडफेक केली. राष्ट्रवादीचे उमेदवार व शिवेंद्रसिंहराजेंचे समर्थक वसंतराव मानकुमरे यांच्या पत्नीसह कार्यकर्त्यांना उदयनराजे समर्थकांनी मारहाण केली. याबाबत दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंद झाल्या आहेत, गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव मानकुमरे व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी आज (बुधवार) जावळी तालुका बंदची हाक दिली होती. त्यानूसार मेढासह अन्य गावातील बाजारपेठ पुर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक वाहतुक सुरळीत सुरु आहे.

Web Title: udyanraje bhosle and shivendrasingh bhosle controversy after satara market closed

फोटो गॅलरी