उजनी धरण भरले 100 टक्के

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

दुष्काळी सोलापूर जिल्हयाची तहान भागवणारे उजनी धरण आज सकाळी 12:00 वाजता 117 टीएमसी क्षमतेने 100% भरले आहे. पुणे आणि दक्षिण अहमदनगरच्या भागात पाऊसाचा जोर कायम आहे. आता सोलापूर जिल्हयातील अनेक गाव आणि शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या साठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
 

पंढरपूरः दुष्काळी सोलापूर जिल्हयाची तहान भागवणारे उजनी धरण आज सकाळी 12:00 वाजता 117 टीएमसी क्षमतेने 100% भरले आहे. पुणे आणि दक्षिण अहमदनगरच्या भागात पाऊसाचा जोर कायम आहे. आता सोलापूर जिल्हयातील अनेक गाव आणि शहरांचा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या साठी लागणार्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.

सोलापूर जिल्हयासह उस्मानाबाद, पुणे आणि अहमदनगर जिल्हयातील काही तालुक्यांना पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होणार.सध्या शेती साठी उजनीच्या कालव्यातून आणि बोगद्यातून शेतीसाठी पाणी सोडल आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे धरणात येणारे पाणीही वाढत आहे. ते पाणी वाढून धरणातून भीमा नदीमध्ये एकदम मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यापेक्षा कालपासून थोड्या प्रमाणात धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात केली आहे.

काल सायंकाळी सहा वाजता धरणातून एक हजार 600 क्‍युसेकने वीजनिर्मितीसाठी पाणी सोडले आहे. याशिवाय कालव्यातून तीन हजार 200, बोगद्यातून 900 क्‍सुसेकनेही पाणी सोडले जात आहे. आज सकाळी धरणातून भीमा नदीमध्ये पुन्हा अडीच हजार क्‍युसेकने पाणी सोडण्यात येणार असल्याचेही पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Ujani Dam is filled 100 percent