'उजनी'चे पाणी हिरवे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

केत्तूर - दुष्काळी परिस्थिती असतानाही सुदैवाने 108 टक्‍के पाणीसाठा झालेल्या उजनी जलाशयात केवळ पाण्याचे नियोजन नसल्यामुळे पाणीसाठा ऐन हिवाळ्यातच 60 टक्‍क्‍यांवर आला आहे. या राहिलेल्या पाण्याने मात्र आपले रंग दाखवण्यास सुरवात केली आहे. यामुळे उजनी जलाशयाच्या पाण्याने प्रदूषणाच्या सर्व सीमा ओलांडल्याचे समोर आले आहे. मात्र, याकडे कोणाचेही लक्ष नसून हे दूषित पाणी पिण्यासाठी म्हणून सर्वजण पळवापळवी करण्याच्या तयारीत असून, त्यादृष्टीने नियोजनबद्ध कामेही सुरू आहेत. सध्या या पाण्याने हिरवा रंग धारण केला असून, हे पाणी योग्य राहिलेले नाही. यापूर्वीही देशी-विदेशी जलतज्ज्ञांनी हे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे सांगितले आहे.
Web Title: Ujani Dam Green Water Pollution