उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातुन आनंद

राजकुमार शहा 
सोमवार, 14 मे 2018

गेल्या आठवडयातच यापुर्वी कालव्याला सोडलेले पाणी बंद झाले होते. मात्र, लगेच आठवड्यातच पाणी सुटल्याने शेतकरी ऊस बांधणीच्या कामाला लागला आहे. या पाण्यामुळे बोअर विहीरी आदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

मोहोळ : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातुन आनंद व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमुग, कडवळ या पिकासह डाळींब, द्राक्ष, बोर केळी या फळबागांना मोठे जिवदान मिळाले आहे. 

गेल्या आठवडयातच यापुर्वी कालव्याला सोडलेले पाणी बंद झाले होते. मात्र, लगेच आठवड्यातच पाणी सुटल्याने शेतकरी ऊस बांधणीच्या कामाला लागला आहे. या पाण्यामुळे बोअर विहीरी आदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सध्या मोहोळ तालुक्यात काही फळबागा फलधारणेच्या अवस्थेत आहेत. तर, बोर व डाळींबाची छाटणी सुरू आहे. या पाण्याचा फळबाग वाढीसाठी मोठा उपयोग होणार असुन, काकडी, टोमॅटो, कलिंगड, खरबूज आदी वेल वर्गीय पिकांनाही दिलासा मिळाला आहे.

Web Title: Ujani dam water release