उजनीचे पाणी 'औज'मध्ये थडकले 

water
water

सोलापूर : उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेले पाणी शनिवारी रात्री 11 वाजता औज बंधाऱ्यात थडकले. त्यामुळे शहराला पुन्हा तीन दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्‍यता आहे. आज (रविवार) सकाळी नउ वाजता बंधाऱ्यातील पाण्याची पातळी २ मीटर १० इंच होती. साडेचार मीटरपर्यंत बर्गे टाकण्याचे काम सुरु झाले आहे. परिसरातील नागरिकानी  त्याची छायाचित्रे खास सकाळसाठी उपलब्ध केली.

बंधाऱ्यात पाणी पोचल्यानंतर काही बर्गे पूर्णपणे काढण्यात येऊन, टाकळी येथील इंकवेलमध्ये पाणीसाठा करण्यात येणार आहे. त्यामुळे टाकळी पंपहाऊसमधील चौथापंप सुरु करणे शक्‍य होईल. दुपारपर्यंत किंवा सायंकाळी औज बंधाऱ्या "ओव्हरफ्लो' होईल. औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे प्रत्येकी साडेचार मीटर भरून घेतले जाणार आहेत. टाकळी येथील जॅकवेलमध्ये आठ ते दहा फूट पाण्याची पातळी ठेवण्यात येणार आहे. 

पाणी पोचल्यानंतर ते अडविणे आणि आवश्‍यक ती कार्यवाही करण्यासाठी अभियंता संजय धनशेट्टी यांच्या नेतृत्वाखालील पथक बंधाऱ्यावर नियुक्त करण्यात आले आहे. या पथकातील कर्मचारी दोन्ही बंधारे भरेपर्यंत त्या ठिकाणी मुक्कामाला असणार आहेत. पाणी पोचल्यावर पाण्याचा अनधिकृत उपसा होऊ नये यासाठीही नियोजन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com