भाजपने श्रमिकांना देशोधडीला लावले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

‘‘श्रमिकांनी भाजपच्या आघाडीचा पराभव केला पाहिजे. दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार, प्रत्येकाला पंधरा लाखांसारखी आश्‍वासने देत स्वप्ने दाखवली. प्रत्यक्षात असंघटित क्षेत्रातील रोजगार उद्‌ध्वस्त झाले. मुस्लिम व आदिवासी, दलितांवर अत्याचार वाढले."

सांगली - भाजप सरकारने देशातील कष्टकऱ्यांना फक्त स्वप्ने दाखवत देशोधडीला लावल्याची टीका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी केली. येथील मराठा सेवा संघात जगण्याचे हक्क आंदोलनातर्फे श्रमिक जनतेचा जाहीरनामा मांडण्यासाठी झालेल्या मेळाव्यात  त्या बोलत होत्या. कॉम्रेड शंकर पुजारी अध्यक्षस्थानी होते.

श्रीमती महाजन म्हणाल्या, ‘‘श्रमिकांनी भाजपच्या आघाडीचा पराभव केला पाहिजे. दरवर्षी दोन कोटी नवे रोजगार, प्रत्येकाला पंधरा लाखांसारखी आश्‍वासने देत स्वप्ने दाखवली. प्रत्यक्षात असंघटित क्षेत्रातील रोजगार उद्‌ध्वस्त झाले. मुस्लिम व आदिवासी, दलितांवर अत्याचार वाढले. लोकशाहीचा गळा घोटला. त्यामुळे आता हे सरकार गेले पाहिजे. 

बाबुराव गुरव, अभिजित मोरे, सुभाष लोमटे, चंद्रकांत यादव,  के. डी. शिंदे. धनाजी गुरव, रमेश सहस्रबुद्धे,  अमोल पवार, मुक्ता श्रीवास्तव, दिगंबर लोहार आदी उपस्थित होते.

जाहीरनाम्यातील चार सूत्रे

  •   अनिर्बंध खासगीकरण, व्यापारीकरण, उदारीकरणास विरोध
  •   वर्ग, जात, लिंग यावर आधारित पिळवणुकीला विरोध
  •   फासीवाद, एकाधिकारशाही जमातवादाला विरोध  
  •   निसर्ग विनाशकारी विकासनीतीला विरोध
     
Web Title: Ulka Mahajan comment