कोल्हापूर : उंबरवाडीचा जवान जम्मूमध्ये शहीद

Umberwadi Jawan Martyred In Jammu
Umberwadi Jawan Martyred In Jammu

महागाव ( कोल्हापूर ) - उंबरवाडी (ता. गडहिंग्लज) येथील जवान जोतिबा गणपती चौगुले (38) हे जम्मूमधील गुरेज सेक्‍टरमध्ये झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. त्यांच्या छातीला गोळी लागल्याने ते जागीच शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. 

श्री. चौगुले हे 2002 मध्ये बेळगाव येथे भारतीय सैन्य दलाच्या मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. सध्या ते हवालदार या पदावर सेवा बजावत होते. आतापर्यंत त्यांची 17 वर्षे सेवा झाली असून बेळगावात भरती झाल्यानंतर गुजरातमधील भूज भागात त्यांच्या सेवेला प्रारंभ झाला. त्यानंतर जम्मूमधील सांबा सेक्‍टर, सिक्कीममधील बकंर सेक्‍टर, पुणे, आकनूर सेक्‍टर, दिल्ली, पश्‍चिम बंगाल आदी ठिकाणी त्यांनी सेवा बजावली आहे. 2015-16 मध्ये त्यांनी दक्षिण अफ्रिकेतील साऊथ सुदान येथे सहा महिने कंमोडोचे ट्रेनिंग घेतले आहे. त्यावेळी त्यांना पोहण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळाले आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा - 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com