उंब्रजमध्ये चोरट्यांनी फोडली तीने एटीएम

उंब्रजमध्ये चोरट्यांनी फोडली तीने एटीएम

उंब्रज (सातारा)- मसूर येथील भरवस्तीत असणारे तीन एटीएम सेंटर चोरट्यांनी फोडून 79 हजार 300 रुपयांची रोकड चोरल्याची घटना आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची नोंद करण्याचे रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याने अधिक तपशील समजू शकला नाही.

मसूर येथील महाराष्ट्र बँक, आयडीबीआय बँक ,अॅक्सिस बँक या बँकेचे एटीएम सेंटर काल रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. यामध्ये महाराष्ट्र बँकेच्या एटीएम सेंटर मधून 75 हजार 300 रूपयांची रोकड तसेच आयडीबीआय बँकेची 4 हजार रुपयांच्या रोकड अशी मिळून सुमारे  79 हजार 300 रूपयांची रोकड चोरीस गेली असून अँक्सिस बँकेची नेमकी किती रक्कम चोरीस गेली आहे याचा आकडा समजू शकला नाही.

मसूर-उंब्रज रस्त्यावर युवराज पाटील चौकाच्या नजिक महाराष्ट्र बँकेचे एटीएम आहे. तर याच रस्त्यावर स्टॅन्ड चौकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आयडीबीआय बँकेचे एटीएम आहे. तर कराड मसूर रस्त्यावर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे. मंगळवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तिन्ही ठिकाणची एटीएम फोडली. प्रत्येक ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरेही चोरट्यांनी फोडले आहेत.

घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. मात्र श्वानपथक काही अंतरावर घुटमळले. तर ठसे तज्ञांना  ठसे मिळू शकले नाहीत. एटीएम सेंटरच्या मशीन्सचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी पाहणी करून उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी सह पोलिस निरिक्षक चंद्रकांत माळी यांना तपासकामी सूचना दिल्या आहेत. सदर घटनेची रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती त्यामुळे अधिक तपशील समजू शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com