हेस्कॉमच्या पॅनेलवर अनधिकृतरित्या जाहिरातबाजी

Unauthorized advertising on Hescom's panel
Unauthorized advertising on Hescom's panel

बेळगाव : शहरात भुमिगत वीज वाहिन्या घालण्याचे काम पूर्ण होत आले आहे. मात्र वीज वाहीन्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर बसविण्यात आलेल्या पॅनेलचा वापर जाहीराती लावण्यासाठी होत असल्याने नाराजी व्यक्‍त होत असून अनधिकृतरित्या पॅनेलवर जाहीरात लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 


हेस्कॉमच्या महत्वाकांक्षी योजनेतंर्गत शहराच्या विविध भागात भुमिगत वीज वाहीन्या घालण्याचे काम 90 टक्‍के पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहराच्या विविध भागात बसविण्यात आलेले पॅनेल प्रवाहीत करण्यात आले आहेत. त्यामुळे वीज प्रवाहीत असणाऱ्या पॅनेलवर कोणत्याही प्रकारचा फलक लावू नये अशी सूचना हेस्कॉमच्यावतीने सातत्याने केली जात आहे. मात्र विविध रुग्णालये, स्कॅनिंग सेंटर, कपड्‌याची दुकाने, विविध प्रकारच्या ऑफर्स यासह इतर माहिती देणारे फलक शहराच्या विविध भागातील पॅनेलवर लावण्यात आले आहे. तसेच हेस्कॉमचे कर्मचारी अनेकदा पॅनेलवरील जाहीरात काढून टाकतात मात्र त्यानंतर काही वेळातच पुन्हा फलक लावले जात आहेत. त्यामुळे हेस्कॉमही हैराण झाले असून शहराच्या सौंदर्यात भर घालणारे पॅनेल जाहीराने भरुन जात आहेत. त्यामुळे जाहीरात लावणाऱ्यांवर कडक कारवाई करणे आवश्‍यक असल्याचे मत शहरवाशीयांमधून व्यक्‍त होत असून रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी जाहीरातीचा फलक लावायचा असल्यास महापालीकेची परवानगी घ्यावी लागते तसेच परवानगी न घेता फलक लावल्यास महापालीकेकडून कारवाई होत असते. मात्र पॅनेलवर जाहीरात लावण्यात आल्यानंतर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही त्यामुळे अधिक प्रमाणात फलक लावण्याकडे कल वाढला आहे. याकडे संबधित विभागाने लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

हेस्कॉमतर्फे पॅनेलवर कोणत्याही प्रकारचा फलक किंवा जाहीरात लावू नये अशी स्पष्ट सूचना करण्यात आली आहे. तरीही काहीजण जाहीरात लावत आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून फलक लावताना कोणत्याही प्रकारची दुर्घटना झाली तर त्याला हेस्कॉम जबाबदार नाही याची दखल घेणे आवश्‍यक आहे.  

-अरविंद गदगकर, सहायक कार्यकारी अभियंता 


संपादन - धनाजी सुर्वे  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com