बारा वर्षांपासून टाक्‍या अस्वच्छ

डॅनियल काळे
रविवार, 6 मे 2018

कोल्हापूर - शहरातील अस्वच्छ पाण्याच्या टाक्‍या कधीतरी शहरवासीयांसाठी डोकेदुखी बनणार, हे सत्यच आहे. एक-दोन वर्षे नव्हे, तर तब्बल बारा वर्षे या टाक्‍याच स्वच्छ केलेल्या नाहीत. २००६ मध्ये शहरातील पाण्याच्या टाक्‍यांची स्वच्छता केली होती. पुन्हा स्वच्छता करण्याची गरज आहे. महापालिकेने यात लक्ष द्यायला हवे. पाणीपुरवठा विभागातील व्यस्त जलअभियंत्यांनी या टाक्‍या स्वच्छ करायचे नियोजन करायला हवे, अन्यथा रोगराई पसरेल, अशी स्थिती आहे. 

शहरात ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या टाक्‍या आहेत, तेथे सध्या अनेक अवैध धंदेही चालतात. हा परिसर म्हणजे मद्यपींचा अड्डाच आहे. येथे वॉचमन नाही. जागेला आणि पाण्याच्या टाकीला संरक्षक भिंत नाही. अशी दयनीय अवस्था आहे. अनेक पाण्याच्या टाकींवर मधाची पोळी आहेत. पाण्याच्या टाकीवर चढता येत नाही. अनेक ठिकाणी पाण्याच्या टाकीचे जिनेच तुटलेले आहेत. टाक्‍या कधी स्वच्छ केल्या आहेत, याची माहिती घेतली असता, या टाक्‍या २००६ मध्ये स्वच्छ केल्याची माहिती मिळाली.

काय करता येईल...
 गळती असलेल्या टाक्‍या टप्प्याटप्प्याने स्वच्छ कराव्यात.
 टाक्‍या स्वच्छ करण्याचे काम स्वतंत्र, प्रशिक्षित यंत्रणेला द्यायला हवे.
 उंच टाक्‍यांची स्वच्छता करताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
 वर्षातून एकदा टाक्‍या स्वच्छ कराव्यात.
 टाक्‍या बंदिस्त हव्यात, झाकणे बंद असावीत.
 काही स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

शहराची लोकसंख्या - 5 लाख 48 हजार
81 - एकूण प्रभाग
28 - एकूण टाक्‍या

Web Title: uncleaned water tank last 12 years