श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वतीने विविध उपक्रम हाती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

वारकऱ्यांसाठी विविध सुविधा राबविता याव्यात यासाठी कऱ्हाडमधून एक हजार स्वयंसेवक पंढरपूर येथे दाखल होणार आहे. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानतर्फे त्याचे नियोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी आषाढी यात्रेनिमित्त विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

कऱ्हाड : वारकऱ्यांसाठी विविध सुविधा राबविता याव्यात यासाठी कऱ्हाडमधून एक हजार स्वयंसेवक पंढरपूर येथे दाखल होणार आहे. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानतर्फे त्याचे नियोजन करण्यात आले आहे. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी आषाढी यात्रेनिमित्त विविध उपक्रम हाती घेतले आहेत.

स्वयंसेवक हा त्यापैकीच एक उपक्रम आहे. ते स्वंयसेवक पंढरपुरात दाखल होणार्‍या 10 ते 12 लाख भाविकांना मंदिर समितीने 10 लाख लिटर मिनरल वॉटर उपलब्ध केले आहे. वारकर्‍यांना फराळाचे वाटप होणार आहे. यासगळ्या कामासाठी व वाकर्‍यांच्या सेवेसाठी कऱ्हाडमधून अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे 1000 हून अधिक स्वयंसेवक पंढरपूरात येणार आहेत. स्वयंसेवक 21 ते 23 जुलै असे तीन दिवस पंढरपूर मुक्कामी राहणार आहेत. तेथे राहून ते  वारकऱ्याची सेवा करणार आहेत.

कऱ्हाड येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. भाजपचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम, शिवाजीराव थोरात, मलकापूरचे नगरसेवक हणमंतराव जाधव, संजय शेटे, संजय शेवाळे, अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक पाटील उपस्थित होते.

दर्शनासाठी भाविकांना करावा लागतोय अडचणींचा सामना

दर्शन रांगेमध्ये भाविकांच्या पायाला दगड टोचतात. तसेच 24-24 तास ऊन-पावसाची तमा न बाळगता चालताना भाविकांना फार मोठा त्रास सहन करावा लागतो. भाविकांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष भोसले यांनी आठ किलोमीटरपर्यंत दर्शन मार्गावर यंदा प्रथमच ग्रीन कार्पेट अंथरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांची  पायपीट सुखकर होणार आहे.

Web Title: Undertake various activities on behalf of Shri Vitthal Rukmini Temple Trust