कॉंग्रेसतर्फे बेरोजगार नोंदणी अभियान 

कॉंग्रेसतर्फे बेरोजगार नोंदणी अभियान 

सांगली : युवक कॉंग्रेसतर्फे बेरोजगार नोंदणी अभियान सुरु करण्यात आले आहे. केंद्रातील भाजप सरकारने देशातील बेरोजगारांना दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र नोटबंदी करुन सुरु असलेलेच रोजगार बंद पाडण्याचे काम केले. यामुळे देशात 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी असल्याचे दिसून आले आहे. या विरोधात देशव्यापी आंदोलन करण्याची कॉंग्रेसची भूमिका आहे. त्यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याची माहिती युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी दिली. 

श्री. चव्हाण म्हणाले,""केंद्रातील मोदी सरकारने महागाई, बेरोजगारी आणि बंद पडत असलेल्या उद्योगांवरुन जनतेचे लक्ष हटवण्यासाठी एनआरसी आणि सीएए हे कायदे आणलेत. नोटबंदीमुळे ज्यांच्याकडे रोजगार होते तेही आता बेरोजगार होत आहेत. त्यातच बीएसएनएल, एअर इंडिया, रेल्वे, भारत पेट्रोलियम हे मोठे उद्योग विकण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे बेरोजगारीत भरच पडणार आहे. देशात केंद्र सरकारमध्ये 33 लाख पदे रिक्त आहेत. ती भरली जात नाहीत उलट बेरोजगारी वाढवण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे.'' 

जिल्हा उपाध्यक्ष संदीप जाधव म्हणाले,""एनआरयु म्हणजेच राष्ट्रीय बेरोजगार नोंदणी रजिस्टर आहे. यात बेरोजगारांनी 8151994411 क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. त्यांची माहिती नोंद केली जाणार आहे. देशातील बेरोजगारांची आकडेवारी समोर येणार आहे. या माध्यमातून केंद्राविरोधात आंदोलन उभारण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातून किमान पाच ते दहा हजार बेरोजगारांची नोंदणी करण्यात येणार आहे.'' 

मिरज विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष संभाजी पाटील, सांगली विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष योगेश राणे, अजित दुधाळ, सनी धोत्रे, ताजुद्दीन शेख, विनायक लाटणे उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com