निराधारांना मिळणार वेळेत निवृत्तीवेतन!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

सातारा - केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची दरमहा मदत मिळण्यास यापूर्वी विलंब होत होता. आता मात्र, केंद्र सरकारने ‘एनएसएपी’च्या (नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्रॅम) माध्यमातून लाभार्थींना त्यांची रक्कम ‘पीएफएमएस’द्वारे (पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टिम) वितरित केली जाणार आहे. त्यामुळे हा विलंब टळून निवृत्तीवेतन वेळेवर मिळण्यास मदत होईल.

केंद्र सरकारच्या या योजनांचा लाभ आता गतिमान पद्धतीने व पारदर्शकपणे राबविणे शक्‍य आहे. महाबळेश्‍वर तालुक्‍याने या पद्धतीने लाभार्थींना वाटप केले आहे. यापूर्वी तहसील कार्यालयाच्या वतीने लाभार्थींच्या नावावर जमा केलेली रक्कम त्या लाभार्थीला काही कारणास्तव मिळत नव्हती. या प्रणालीमध्ये लाभार्थीला वेळेवर रक्कम मिळणे व बॅंकेतून तहसील कार्यालयाकडे परत आलेली रक्कम कोणत्या लाभार्थींची आहे, याची माहिती प्रशासनाला होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनाही येत्या काळात या प्रणालीद्वारे राबविण्याच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे.

Web Title: Unfounded Retirement Pension