सांगलीत पोलिसाचा हत्याराने वार करून निर्घृण खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

समाधान मानटे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. सांगली पोलिस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले. सध्या मिरज शहर पोलिस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी होती. विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये ते पत्नीसह राहत होते. त्यांना एक लहान मुलगा आहे. 

सांगली : मिरज शहर पोलिस ठाण्याकडील समाधान मानटे (वय २९) यांचा काल मध्यरात्री धारदार हत्याराने सपासप वार करून अमानुष खून करण्यात आला.

संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कुपवाड रोडवरील हॉटेल रत्ना डिलक्स येथे ही घटना घडली. हॉटेलच्या सिसिटीव्ही कॅमेरात हा प्रकार कैद झाली आहे. यामध्ये दोन हल्लेखोर असल्याचे दिसून आले आहे.                    

समाधान मानटे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. सांगली पोलिस दलात ते २०१३ मध्ये भरती झाले. सध्या मिरज शहर पोलिस ठाण्यात त्यांची नेमणूक होती. त्यांच्याकडे वाहतूक कारवाईची जबाबदारी होती. विश्रामबाग येथील पोलीस वसाहतीमध्ये ते पत्नीसह राहत होते. त्यांना एक लहान मुलगा आहे. 

मानटे काल (मंगळवारी) रात्री ड्युटी संपवून घरी येत होते. त्यावेळी ते हॉटेल रत्नामध्ये दारू पिण्यास गेले होते. तेथे त्यांचा  दोघांशी वाद झाला. त्यानंतर ते हॉटेल व्यवस्थापकाशी हॉटेलच्या आवारातच बोलत थांबले. त्यावेळी वाद झालेले ग्राहक हॉटेलबाहेर निघून गेले. मात्र त्यातील एकजण गाडीतील धारदार हत्यार घेऊन आला आणि त्याने मानटे यांच्यावर सपासप १४ वार केले. यामध्ये मानटे रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच मरण पावले.        

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, गुंडविरोधी पथक, संजयनगर, विश्रामबाग, सांगली शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. मानटे यांच्या खुनाची घटना हॉटेलच्या 'सीसीटिव्ही' कॅमेर्‍यात रेकाॅर्ड झाली आहे. त्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. त्यावरून पोलिस पुढील तपास करत आहेत. हॉटेलच्या व्यवस्थापकसह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ऐन निवडणुकीच्या काळात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: unidentified man killed police in Sangli