सोलापुरात 50 ठिकाणी युनिव्हर्सल टॉयलेट

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

सोलापूर- स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहराच्या विविध भागांत 50 ठिकाणी स्टीलची स्वच्छतागृहे (युनिव्हर्सल टॉयलेट) उभारण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १३ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अशा पद्धतीची स्वच्छतागृहे वर्धा येथे उभारण्यात आली आहे. याशिवाय, आंध्र प्रदेश व तेलंगणात अशा स्वच्छतागृहांची संख्या मोठी आहे. स्त्री व पुरुषांसाठी प्रत्येकी दोन स्वच्छतागृहे आणि प्रत्येकी एक मुतारी अशा पद्धतीने त्याची कार्यवाही केली जाणार आहे. ई टॉयलेटप्रमाणे सुविधा असणार आहे. 

ही स्वच्छतागृहे स्टेलनीस स्टील शिट व ऍल्युमिनियम कंपोझिट शिटचे असून त्याला संरक्षणासाठी ग्रील व्हेंटिलेटर, पाण्याची टाकी , लाइट व ड्रेनेज व्यवस्था देण्यात आली आहे. टिकाऊ व स्वच्छतेच्या दृष्टीने खूप चांगले आहेत असे दिसले. पहिल्या टप्प्यात प्रस्तावित ठिकाणे ः डी मार्ट जुळे सोलापूर कॉर्नर, सैफुल चौक, आयटीआय कंपाउंड वॉल, वसंतनगर रस्ता बसथांबा, पोटफाडी चौक, आसरा चौक, वालचंद कॉलेज परिसर, जुना बोरमणी नाका, एम्प्लॉयमेंट चौक परिसर, जुन्या पीएचई बंगल्यासमोर, शिक्षण मंडळ आतील बाजूस, गुरूनानक चौक आणि सागर चौक. 

तिरुपती परिसरात अशा पद्धतीची स्वच्छतागृहे आहेत. त्यामुळे स्वच्छतेसह लोकांच्या सोयीचीही आहेत. या कामाची निविदा काढण्यात आली असून, लवकरच त्याची कार्यवाही होईल. - त्र्यंबक ढेंगळे-पाटील, उपायुक्त

Web Title: Universal Toilet in 50 places in Solapur