esakal | अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार; भिवघाटातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार; भिवघाटातील घटना

अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार; भिवघाटातील घटना

sakal_logo
By
शैलेश पेटकर

सांगली : येथील भिवघाट (ता. आटपाडी) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तरस ठार झाले. आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. सहा सात वर्षीय मादी असल्याचे समोर आले आहे. वनविभागाच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. आटपाडी येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली.

हेही वाचा: रुपाली चाकणकर यांना शूर्पणखा संबोधलेलं नाही - चित्रा वाघ

सांगली जिल्ह्यात तरसांची संख्या कमी होत चालली आहे. तरस हा निशाचर प्राणी असून तो रात्रीच्यावेळी खाद्याच्या शोधात बाहेर पडतो. मेलेली जनावरे खात असल्याने तो स्वच्छता दूत म्हणूनही ओळखला जातो.

भिवघाट परिसरात यापुर्वी वाहतूकीच वर्दळ नव्हती. सद्यपरिस्थितीत वाहतूक मोठ्याप्रमाणावर सुरू झाल्याने असे अपघात होत आहे. तसेच तरसांची संख्याही कमी होत असल्याने प्राणीमित्रांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तरस हा रात्रीच्यावेळी बाहेर पडतो. अज्ञात वाहनाच्या धडकेत या तरसाचा मृत्यू झाला. नागरिकांनी वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील व प्राणीमित्र अजित काशीद यांनी केले आहे.

हेही वाचा: 'नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही अशी राज्यसरकारची अवस्था'

loading image
go to top