मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही - एकनाथ शिंदे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

नगर : निष्ठावान शिवसैनिकांची हत्या झाली. मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. दोन्ही कुटुंबियांना शिवसेना कधीही अंतर देणार नाही, असे मत व्यक्त करीत सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.   

केडगाव येथे दहा दिवसांपूर्वी दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली. आज त्या शिवसैनिकांच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, महापौर सुरेखा कदम आदी उपस्थित होते.

मंत्री दादा हुसेन म्हणाले, शिवसैनिकांची हत्या झाली अशी घटना महाराष्ट्र कधी घडली नाही. राज्यातील संपूर्ण शिवसेना दोन्ही कुटुंबियांच्या पाठीशी आहे. शिवसैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. मारेकऱ्यांना कडक शिक्षा होईपर्यंत शिवसेना पाठपुरावा करणार आहे.

Web Title: Unless the killers are hanged, the Shiv Sena will not be in piece said by eknath shinde