जयंतीचा वायफळ खर्च टाळून अनाथाश्रमास दिले धान्य

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 मार्च 2018

सातरस्ता परिसरात रविवारी संत कैकाडी महाराज यांची तिथीनुसार 111 वी जयंती साजरी करण्यात आली. ही जयंती काहीशी आगळीवेगळी ठरली आहे, कारण मुळेगाव येथील अनाथ आश्रमासाठी जयंती उत्सव मंडळाने धान्य वाटप केले. 

सोलापूर : सातरस्ता परिसरात रविवारी संत कैकाडी महाराज यांची तिथीनुसार 111 वी जयंती साजरी करण्यात आली. ही जयंती काहीशी आगळीवेगळी ठरली आहे, कारण मुळेगाव येथील अनाथ आश्रमासाठी जयंती उत्सव मंडळाने धान्य वाटप केले. 

मुळेगाव येथे परमेश्‍वर काळे हे अनाथाश्रम चालवित आहेत. या आश्रमाला शासनाचे कोणतेही अनुदान नाही. तेथील अनाथ मुलांची गैरसोय होऊ नये म्हणून जयंतीचा अतिरिक्त खर्च टाळून व खऱ्या अर्थाने संत कैकाडी महाराज प्रतिष्ठानच्यावतीने मदतीचा हात देण्यात आला. संत कैकाडी महाराज यांच्या जयंतीसाठी कोणत्याही प्रकारचा वायफळ खर्च न करता फक्त मूर्तिपूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते आश्रमाला अन्न धान्य देण्यात आले. 

या कार्यक्रमास महानगरपालिकेचे नगरसेवक नागेश गायकवाड, उमेश गायकवाड, किसन जाधव, समाज जिल्हाध्यक्ष नागेश गायकवाड, संस्थापक-अध्यक्ष चेतन गायकवाड, दिलीप कोल्हे, अनिल जाधव, शंकर जाधव, सुभाष जाधव, अनिल गायकवाड, देवा गायकवाड, सूरज जाधव, गोपाळ नंदूरकर, तानाजी जाधव, नितीन गायकवाड, बंटी चंदनशिवे, स्वप्निल मूडदेट्टी, चंटी बिटला, परमेश्‍वर काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विक्रांत गायकवाड, आकाश बोंद्रे, सूरज धोत्रे, सागर गोरे, अभिषेक कांबळे, तुकाराम चाबुकस्वार, शिवराज कांबळे, शुभम कोरपे, गणेश जाधव, विशाल चव्हाण यांनी परिश्रम घेतले. संस्थापक अध्यक्ष चेतन गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. दत्तात्रय सनके यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत जाधव यांनी आभार मानले.

Web Title: Unnecessary Expenses avoided by Child School Food Distribution