दुचाकीवर मुलांसह असुरक्षित वाहतूक

परशुराम कोकणे
बुधवार, 9 मे 2018

सोलापूर : रस्त्यावरून जाताना अनेकदा दुचाकीवर पालकांसह लहान मुलेही दाटीवाटीने बसविल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवर पती-पत्नीसह समोर एक आणि मागे एक किंवा दोन मुले बसविली जात आहेत. मुलांना असुरक्षितपणे बसविल्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेच्या मांडीवर मुलांना बसविले जाते. एका हाताने मुलाला पकडून महिलाही असुरक्षितपणे बसलेल्या असतात. रस्त्यावरील गतिरोधक, खड्डे यामुळे अपघात होऊ शकतो. खडी किंवा वाळू यामुळे दुचाकी घसरूनही अपघात होऊ शकतो. वाहतूक नियोजनासाठी चौकाचौकात थांबलेल्या पोलिसांकडून अशा वाहनधारकांकडे सहानुभूती म्हणून काणाडोळा केला जातो. रिक्षा करून जाणे परवडत नसल्याने दुचाकीवरून मुलांसह चार-पाचजण निघालेले असतात. नागरिकांनी दुचाकीवरून जाताना मुलांना असुरक्षितपणे नेऊ नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

अनेकदा दुचाकीवर लहान मुलांना असुरक्षितपणे बसविल्याचे दिसून येते. आम्ही वाहनधारकांना थांबवून काळजी घेण्याची सूचना करतो. आवश्‍यकता नसेल तर मुलांना दुचाकीवरून सोबत नेणे टाळावे. अपघात टाळण्यासाठी सर्वांनीच वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे. 
- सुनील जाधव, 
पोलिस निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा

Web Title: unsafe driving on two wheeler with children