मुख्यमंत्र्यांची भेट मिळेपर्यंत खंडपीठासाठी साखळी उपोषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंचबाबत चर्चा करण्यासाठी जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही तोपर्यंत कोल्हापुरातून एक डिसेंबरपासून साखळी उपोषणाने आंदोलनाचा लढा नव्याने उभारण्याचा निर्धार खंडपीठ कृती समितीच्या बैठकीत शनिवारी करण्यात आला.

अवमान याचिकेबाबत माघार घ्यायची नाही, तर ती लढायची आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची परिषद घेऊन आंदोलनाची धार वाढविण्यावरही वकिलांचे एकमत झाले. समितीचे निमंत्रक आणि जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश मोरे अध्यस्थानी होते. सर्किट बेंचचा लढा अवमान याचिकेमुळे थंडावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा आश्‍वासन देऊनही भेट दिली नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून नव्याने आंदोलन करू, असा निर्धार सहा जिल्ह्यांतील वकिलांनी बैठकीत केला. आंदोलनाची सुरवात 1 डिसेंबरपासून कोल्हापुरातून साखळी उपोषणाने करायची; तसेच जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धारही करण्यात आला.

Web Title: Until the bench for the visit of Chief Minister chain hunger strike