अवकाळी पाऊस
अवकाळी पाऊसsakal

अवकाळी पाऊस रब्बी पिकांना लाभदायक तर फळबागांना हानीकारक

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल, खर्चामध्ये मोठी वाढ

सांगोला : सांगोला तालुक्‍यात रब्बीच्या सरासरी ४६ हजार ९५ हेक्‍टर क्षेत्रापैकी ४१ हजार ४६३ हेक्‍टर क्षेत्रावर (८९.९५ टक्के) पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी दिली. सध्याचा अवकाळी पाऊस रब्बीच्या काही पिकांना लाभदायक असला तरी द्राक्ष, डाळिंब फळबागांना हानीकारक ठरणार आहे.

सांगोला तालुक्‍यात रब्बी ज्वारी, गहू, मका, हरभरा असे तृणधान्य व कडधान्याबरोबरच सूर्यफूल या गळीत धान्याची पेरणी केली जाते. तालुक्‍यात सर्वाधिक रब्बी ज्वारीची ३९ हजार ३२१ हेक्‍टर क्षेत्रापैकी ३४ हजार ६७६ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीबरोबरच ५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर मका व ९४६ हेक्‍टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली आहे. तालुक्‍यात ज्वारी, गहू, मका अशा तृणधान्याच्या एकूण सरासरी ४५ हजार ४६० हेक्‍टर क्षेत्र असून त्यापैकी ४० हजार ६७३ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. तसेच कडधान्याच्या ६२३ सरासरी हेक्‍टर क्षेत्र असून यावर्षी ७९० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

फळबागांना अवकाळीचा फटका
तालुक्‍यात गेले दोन-तीन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या हलक्‍या सरी येत आहेत. दिवसभर ढगाळ वातावरण झालेले असते. या अवकाळी पावसामुळे तालुक्‍यातील द्राक्षांबरोबरच डाळिंब बागांना मोठा फटका बसला आहे. सतत पडणारा हलक्‍या पावसाच्या सरीमुळे द्राक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात घडकुज होत असल्याने द्राक्ष बागांची मोठी हानी होत आहे. द्राक्षांच्या काही बागा संपूर्णपणे या अवकाळी पावसामुळे फेल जाणार आहेत. द्राक्षबरोबरच बहार धरलेल्या डाळिंबावर कुजवा, कळीगळ व यापुढे पडणाऱ्या उन्हामुळे तेल्या रोगाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस फळबागांसाठी हानिकारक ठरला आहे.

आकडे बोलतात..
रब्बी पिकाचे नाव, पेरणी क्षेत्र हेक्‍टरमध्ये (टक्केवारी) : रब्बी ज्वारी - ३४ हजार ६७६ (८८.१९), गहू - ९४६.६० (१४४.६४), मका - ५,०५१ (९६.०६), हरभरा - ७९० (१३०.३६). एकूण रब्बीच्या सरासरी ४६ हजार ९५ हेक्‍टर क्षेत्रापैकी ४१ हजार ४६३ हेक्‍टर क्षेत्रावर (८९ ९५ टक्के) पेरणी झाली आहे.

ऋतुचक्र बदलाने शेतकरी हावालदील
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे नैसर्गिक ऋतुचक्रही बदलत चालले आहे. ऐन उन्हाळ्यात, हिवाळ्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने या ऋतुचक्र बदलामुळे याचा थेट परिणाम पिकांवर व फळबागांवर होत आहे. फळबागांवर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढत असून पिकांचे उत्पादन कमी होत आहे. या ऋतुचक्र बदलाने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होत असून एकूण खर्चात मात्र मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

सध्याच्या अवकाळी पावसामुळे आमच्या बहार धरलेल्या द्राक्षबागांवर मोठ्या प्रमाणात घडकूज झाली आहे. डाळिंब बागांवरही रोगराईत वाढ होणार आहे.
- संतोष खंडागळे, द्राक्ष उत्पादक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com