मिरजेत उर्मिलाने दिला पुरग्रस्तांना आधार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मिरज - ती आली, पुरग्रस्तांच्या वेदना तिने जाणून घेतल्या, मदत आणि दिलासाही दिला. त्यांचे अश्रू पुसताना तिच्या चेहऱ्यावरही मासुमियत जागली.

मिरज - ती आली, पुरग्रस्तांच्या वेदना तिने जाणून घेतल्या, मदत आणि दिलासाही दिला. त्यांचे अश्रू पुसताना तिच्या चेहऱ्यावरही मासुमियत जागली.

अभिनेत्री उर्मिला मांतोडकरने आज मिरजेतील पुरग्रस्तांशी संवाद साधला. राजकारणी म्हणून आलेली नाही तर राष्ट्रसेवा दलाची कार्यकर्ती म्हणून तुम्हाला भेटायचे आहे, असे सुरुवातीलाच सांगत पुरग्रस्तांच्या मनात विश्वास जागवला. शहरात शाळा क्रमांक बारामध्ये कृष्णाघाट व ढवळी येथील ग्रामस्थ आश्रयाला आहेत. उर्मिलाने त्यांना कपडे, ब्लॅंकेट, खाद्यपदार्थ इत्यादी साहित्य दिले.

पुरामुळे घरदार हरवलेल्या महिलांच्या भावना जाणल्या. लहानांसोबत लहान होताना तिने लकडी का काठी, काठी पे घोडा गाण्यावर तालही धरला. देशभक्तीपर घोषणा दिल्या, राष्ट्रसेवा दलाची गाणी गायली. चेहऱ्यावरचं हसू हरवू देऊ नका, असे तिने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Urmila Mantodkar visited flooded area in Sangli