उरमोडीचे पाणी मोफत मिळणार

रुपेश कदम
सोमवार, 11 जून 2018

मलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन विठ्ठल रूक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.

मलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन विठ्ठल रूक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी केले.

उरमोडीचे पाण्याचे नरवणे येथील काटकर वस्ती येथे अतुल भोसले यांच्या हस्ते पाणी पुजन करण्यात आले. त्यानंतर कुकुडवाड (ता. माण) येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार दिलिप येळगावकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, सदाशिव खाडे, जिल्हा परिषद सदस्य सुवर्णा देसाई, मायणीचे सरपंच सचिन गुदगे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, पंचायत समिती सदस्य तानाजी काटकर, बाळासाहेब खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अतुल भोसले म्हणाले की, शेतकऱ्यांना सर्वात मोठी कर्ज माफी देणारे महाराष्ट्र एकमेव राज्य आहे. जलसंधारणाची कामे व रस्ते विकासाची कामे देशभर सुरु आहेत. ग्रामीण भागातही भाजपची ताकत वाढत असल्यामुळे विरोधक हवालदिल झाले आहेत. सत्ता नसल्याने सैरभैर झालेले विरोधक बैचैन झाले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपाचा आमदार निवडून दिला तर या दुष्काळी भागाचे नंदनवन होण्यास काहीच अडचण नाही.

माजी आमदार येळगावकर म्हणाले की, माण-खटावचा पाणी प्रश्न पूर्णपणे सोडविण्याठी शासन आमच्या पाठीशी आहे. माणच्या जनतेने आता भाजपचा आमदार करण्याचा निश्चय केलाय. त्यामुळे दिशाभुल करुन जनतेला फसवणाऱ्या  लोकप्रतिनिधीला घरी बसवा. अनिल देसाई म्हणाले की, उरमोडीचे पाणी माण-खटाव मध्ये केवळ युती शासनामुळेच आले आहे. माणचे प्रतिनिधी लोकांची दिशाभूल करुन सगळे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करित आहेत. आता जनतेने त्यांना ओळखले असून त्यांची लबाडी उघड झाली आहे. हा बहाद्दर आयत्या कामाचे श्रेय घेण्यात पटाईत आहे. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही पण आता या पुढे कुणी आडवे आले तर त्याला आडवा केल्याशिवाय राहणार नाही. दशहत करुन जनतेला फसवायच बंद करा.
यावेळी अतुल भोसले यांचा राज्यमंत्री पदी निवड झालेबद्दल तर अनिल देसाई यांची सहकार आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्र संयोजक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

अतुल भोसले, डॉ. दिलिप येळगावकर, अनिल देसाई यांनी वडजल (ता. माण) येथील विजेचा धक्का बसून मयत झालेल्या आबाजी जोती काटकर या शेतकऱ्याच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच मुख्यमंत्री निधीतून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: Urmodi water is available free of cost