'बोरामणी'च्या निधीचा होटगी रोड विमानतळासाठी वापर

अभय दिवाणजी
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरून सेवा देण्यात सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीसह 18 अडथळ्यांच्या अडचणी असतानाही कोट्यवधींच्या विकासकामांनी जोर धरला आहे. बोरामणी विमानतळासाठीचा मंजूर निधी होटगी रस्त्यालगतच्या विमानतळासाठी खर्च होत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

सोलापूर- हैदराबाद महामार्गावरील बोरामणी विमानतळाच्या रखडलेल्या कामाकडे पाहण्यासाठी एकीकडे संबंधितांना वेळच नाही. तर दुसरीकडे होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरून सेवा देण्यात सिद्धेश्‍वर कारखान्याच्या चिमणीसह 18 अडथळ्यांच्या अडचणी असतानाही कोट्यवधींच्या विकासकामांनी जोर धरला आहे. बोरामणी विमानतळासाठीचा मंजूर निधी होटगी रस्त्यालगतच्या विमानतळासाठी खर्च होत असल्याचा आरोप माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला. शिंदे यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

हैदराबाद महामार्गाजवळच्या बोरामणी येथे उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी 2009 पासून सातत्याने पाठपुरावा होत होता. सरकार बदलल्यानंतरही या विमानतळाच्या उभारणीसाठीचे प्रयत्न सुरू होतेच. तसा पत्रव्यवहार केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केला. या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारूच नये, यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. भाजपचे दोन मंत्री, एक खासदार असतानाही या विमानतळाबाबत सकारात्मक विचार होत नाही. शासनाच्या अखत्यारीतील 33 हेक्‍टर जमिनीचे निर्वनीकरण, तसेच सात शेतकऱ्यांच्या 27 हेक्‍टर जागेचे संपादन होणे बाकी आहे. या दोन बाबी सोडल्या तर बोरामणी येथील विमानतळाच्या उभारणीला कसलाही अडथळा नाही. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून राजकीय नेत्यांच्या अनास्थेमुळे ही सारी प्रक्रिया ठप्प असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी, एक प्रार्थनास्थळ, मोबाईल टॉवर, परिसरातील उंच इमारती अशा 18 अडथळ्यांमुळे होटगी रस्त्यालगतच्या विमानतळावरून सेवा देता येणार नसल्याचा अहवाल केंद्र शासनाच्या समितीने दिला आहे. सिद्धेश्‍वरच्या चिमणीचे प्रकरण न्यायालयात आहे. अन्य अडथळेही हटवले गेलेले नाहीत. तरीही या विमानतळाच्या विकासाची कोट्यवधींची कामे मात्र मार्गी लागलेली आहेत.

विकासकामांना जोर
संरक्षक भिंतींच्या उंचीत वाढ, तारेच्या कुंपणाची कामे (बार बेड वायर), प्रशासकीय व विमानतळाची नवी इमारत, जमीन सपाटीकरण, धावपट्टीच्या अखेरच्या भागाचा उतार देऊन विस्तार, दोन्ही प्रवेशद्वारावरील साइन बोर्ड, रात्रीच्या सेवेसाठीच्या सुविधांची देखभाल, दुरुस्तीची कामे, संरक्षक भिंतीच्या आतून संपूर्ण विमानतळावर फिरण्यासाठी रस्ता, विमानतळाच्या 365 एकरांवर पूर्वीची झाडे काढून तेथे नव्याने वृक्षारोपण करण्यात आले आहे.

Web Title: Use of Boramanis fund for Hotgi Road Airport