गव्यांना क्षारयुक्त चाटण मिळावे यासाठी पांढऱ्या विटांचा वापर

सुधाकर काशीद
बुधवार, 12 डिसेंबर 2018

कोल्हापूर - दाजीपूरच्या जंगलात पाणवठ्यावर आणि पाणवठ्याच्या परिसरात आता झाडांना बांधलेल्या पांढऱ्या विटा दिसत आहेत. अनेकांना त्याचे कुतूहल आहे. पण या विटा म्हणजे अभयारण्यातील गव्यांना क्षारयुक्त चाटण (सॉल्ट लिक) मिळावे म्हणून वनविभागाने उचललेले पाऊल आहे. जसे आपल्या ताटातील चिमूटभर मीठ जेवणाला चव आणते, शरीराला पूरक क्षार पुरवते.

साधारण तसाच हा प्रकार आहे. तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी अशा पद्घतीने गव्यांना क्षार मिळण्याची सोय होती. त्यानंतर ती खंडित झाली होती. आजपासून ती पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे अभयारण्यातील पाणवठ्याजवळ या विटा झाडावर लटकू लागल्या आहेत. गवा येतो या खारट मिठांच्या विटेला पाच-सहा वेळा आवर्चून चाटतो आहे. गवा हा शाकाहारी प्राणी आहे. गवत हे त्याचे अन्न आहे. साधारण पाळीव शाकाहारी प्राण्यांना त्यांच्या आहारातून मिनरल मिक्‍स्चर देतात. 

जेणेकरून त्यांना त्यातून काही पूरक घटक मिळतात. 
पण जंगलातील तृणभक्षी प्राण्यांना असे पुरक घटक मिळत नाहीत. सॉल्टलिक या मिठासदृश्‍य वीटेचे चाटण त्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे ही वीट झाडांना टांगली जाते. गवे या वीटेला हमखास चाटतात.

किंबहुना जिभेला थोडी चवच आणतात. जंगलातल्या या विटा गव्यांनी चाटून चाटून झिजल्या की त्या जागी नव्या विट्या बांधल्या जातात. या क्षारयुक्त वीटा चाटण्यासाठी गवे त्या ठिकाणी हमखास येतात. वन विभागाचे कर्मचारी त्यावर वेळोवेळी लांबून लक्ष ठेवतात. आज डॉक्‍टर गिरीष कुलकर्णी, डॉ. चित्रलेखा कुलकर्णी व बापसन नेचर क्‍लबने या वीटा वनक्षेत्रपाल प्रशांत तेंडुलकर व राजेंद्र धुमाळ यांच्याकडे सुपुर्द केल्या. 

- सुधाकर काशीद

Web Title: use of Salt Bricks in Forest for Gava