स्वत:कडील बियाणे वापरा; कृषी विभागाचा अजब फतवा 

तात्या लांडगे 
गुरुवार, 28 जून 2018

सोलापूर - राज्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र एक कोटी 46 लाख 50 हजार हेक्‍टर आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बियाण्यांची उपलब्धताही करण्यात आली. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबीनसह अन्य काही बियाण्यांची अतिरिक्‍त मागणी वाढली. त्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याऐवजी शेतकऱ्यांनी आता स्वत:कडीलच बियाणे वापरावीत, असे परिपत्रक कृषी विभागाने काढले. त्यामुळे ऐन खरीप हंगामात शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. 

ज्वारी, बाजरी, भात, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, सोयाबीन, बिटी कापूस आणि कपाशी या बियाण्यांचे नियोजन शेतकऱ्यांच्या मागणीनुसार केले आहे. त्यासाठी महाबीज, राज्य बियाणेनिर्मिती मंडळ व खासगी कंपन्यांकडील बियाण्यांची व्यवस्था शासनाने केली. परंतु भात, सोयाबीनसह काही बियाण्यांची अतिरिक्‍त मागणी झाली आहे. सद्यःस्थितीत तातडीने बियाण्यांचा पुरवठा होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडील उपलब्ध बियाण्यांचा वापर खरिपात करण्याकरिता कृषी विभागाने जागृती करावी, असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. तसेच शासनाकडून घेतलेल्या बियाण्यिांपासून तयार केलेली बियाणे पुढील तीन वर्षांपर्यंत वापरता येतात. परंतु पेरणीपूर्वी शेतकऱ्यांनी त्या बियाण्यांची चाचणी करावी आणि मगच पेरणीसाठी वापरावे, असेही परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली असून, कृषी विभागाच्या निर्णयाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. आता शेतकऱ्यांना खासगी दुकानदारांकडून जास्त किमतीने बियाणे खरेदी करावी लागणार आहेत. 

Web Title: Use the seeds from yourself