निरुपयोगी प्लॅस्टिक रस्ता डांबरीकरणात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

कऱ्हाड - निरुपयोगी प्लॅस्टिकचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात करण्याचा शासनाने प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतले होते. राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर सध्याच्या उपलब्ध प्लॅस्टिक वस्तू तसेच औद्योगिक वापरातील निरूपयोगी प्लॅस्टिक रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात वापर शासनाने अनिवार्य केला आहे. 

कऱ्हाड - निरुपयोगी प्लॅस्टिकचा वापर रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात करण्याचा शासनाने प्रायोगिक तत्त्वावर हाती घेतले होते. राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर सध्याच्या उपलब्ध प्लॅस्टिक वस्तू तसेच औद्योगिक वापरातील निरूपयोगी प्लॅस्टिक रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात वापर शासनाने अनिवार्य केला आहे. 

राज्य शासनाने प्लॅस्टिक बंदीचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यास मदत होईल. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करताना सध्या उपलब्ध असलेल्या मोठ्या प्रमाणातील प्लॅस्टिक वस्तू, औद्योगिक वापरातील प्लॅस्टिक हे निरुपयोगी होणार आहे. त्याचा वापर रस्त्याच्या डांबरीकरण कामात कोरड्या पद्धतीने केल्यास डांबरीकरणाची कामे कमीत कमी किंमतीत व चांगल्या गुणवत्तेवर होत असल्याचे निदर्शनास आले. त्या संदर्भात केंद्राने नऊ नोव्हेंबर २०१५ ला डांबरीकरणाच्या वरच्या भागातील थरात निरुपयोगी प्लॅस्टिकचा वापर करणे अनिवार्य व बंधनकारक केले आहे. राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर सध्या उपलब्ध होणाऱ्या निरुपयोगी प्लॅस्टिकचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाला करणे अनिवार्य केले आहे. केंद्र शासनाने नोव्हेंबर २०१५ ला दिलेल्या पत्रांतील सूचनांची कार्यवाही करण्याचे तसेच काम करताना रस्ते महासभेने प्रकाशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करण्याचे निर्देश दिले आहेत. निरुपयोगी प्लॅस्टिकचा वापर झालेल्या रस्ता डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर प्रत्येक दर तीन महिन्यांनी कामाच्या दर्जाबाबत वेळोवेळी तपासणी करण्यात यावी, एका वर्षाच्या कालावधीनंतर या कामांबाबतचा अहवाल शासनास सादर करण्याचेही सूचित केले आहे. रस्त्याच्या कामांचे नकाशे, अंदाजपत्रक तयार करताना निरूपयोगी प्लॅस्टिकची तरतूद अंदाजपत्रकात करावी लागणार आहे. 

शासनाच्या निर्णयातील प्रमुख मुद्दे
प्लॅस्टिक वापराने रस्ते कमीत कमी किमतीत व चांगल्या गुणवत्तेचे 
एका वर्षाच्या कालावधीनंतर कामांबाबतचा शासनाला अहवाल 
निरुपयोगी प्लॅस्टिकची तरतूद अंदाजपत्रकात होणार
प्लॅस्टिक वापराची जबाबदारी मुख्य अभियंत्यांवर

Web Title: Useless plastic use in road