नवी क्षेत्रे निवडा, नव्या वाटा तुडवा - उत्तम कांबळे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जानेवारी 2017

सांगली - बहुजन तरुणांनो, नवी क्षेत्रे निवडा, नव्या वाटा तुडवा, असे प्रतिपादन ‘सकाळ’चे संपादक संचालक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी केले. बिसूर (ता. मिरज) येथे मकर संक्रांत व पानिपत युद्धात मराठा सैन्याने केलेल्या पराक्रमाबद्दल पाळण्यात येणाऱ्या शौर्य दिनानिमित्त श्री दत्त मंदिरात व्याख्यान झाले.

‘बहुजन तरुणांची उद्याची वाटचाल’ असा विषय होता. कुमार वाचनालयाचे अध्यक्ष विठ्ठलराव घोरपडे अध्यक्षस्थानी होते. डॉ. मोहन पाटील, माजी गटविकास अधिकारी ए. के. पाटील. डॉ. नामदेव कस्तुरे, डी. के. पाटील यांची प्रमुख उपस्थित होते. सरपंच विष्णू पाटील यांनी श्री. कांबळे याचा सत्कार केला. 

श्री. कांबळे म्हणाले, ‘‘तरुणांनी प्रथम स्वत:ची ध्येये नक्की करावीत. कुठं जायचं, कसं जायचं, कुठं थांबायचं हे आधी ठरवा. जगाची दिशा ओळखा. जिकडं कुणी फारसं जात नाही, असं अस्पृश्‍य क्षेत्र निवडा. स्पर्धा कमी आहे, अशी नवी दिशा शोधा.’’

ते म्हणाले, ‘‘उगाळून गुळगुळीत झालेली विचार पद्धती सोडा. प्रयत्नवाद धरा. कालबाह्य प्रथा, परंपरा बदला. बंडखोर वृत्ती जोपासा. ज्येष्ठांनो, तरुणाईला मित्र बनवा. नव्या युगाची हाक ऐका. देवभोळेपणा सोडा. अनुभवाचे बोल ऐकवा, पण नव्याची वाट अडवू नका.’’ श्री. कांबळे यांनी फिरस्ती करताना अनुभवलेल्या संकटांवर मात करीत यश मिळवणाऱ्यांच्या जिद्दीच्या कथा सांगितल्या. मराठा क्रांती मोर्चा (बिसूर), कुमार वाचनालय, बिसूर हायस्कूल, ग्रामपंचायत, हनुमान शिक्षण प्रसारक मंडळ, विकास सोसायटी यांनी संयोजन केले. सुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सुतक कमी केल्याचे कौतुक
बिसूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने सकल मराठा समाजाने सुतक व अंत्येष्ठी विधीचा कालावधी कमी करण्याचा निर्णय सामुदायिकपणे घेतल्याबद्दल श्री. कांबळे यांनी ग्रामस्‍थांचे कौतुक केले. प्रथा तपासा, चांगलं टिकवा, कालबाह्य फेकून द्या, वेळ, श्रम व पैशाला महत्त्व आलंय. साऱ्याच्या बचतीचा विचार करा. तेच प्रगतीला पूरक आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: uttam kamble speech