मोहोळ तालुक्यात एकवीस हजार बालकांना लसीकरण

राजकुमार शहा 
बुधवार, 5 डिसेंबर 2018

मोहोळ : गोवर, रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत सात दिवसाच्या कालावधीत मोहोळ तालुक्यातील एकवीस हजार बालकांना लसीकरण केले असुन अद्यापही हे काम सुरूच आहे . या कामी  एकुण 650 कर्मचाऱ्यांची नेमणुक केली असुन एकुण 92 टक्के काम झाले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ  अरूण प्राथ्रुडकर यांनी दिली.

27 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत ही लसीकरण मोहिम सुरू राहणार आहे. 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या  सात दिवसाच्या कालावधीत या मोहीमे साठी 24 हजार बालक लाभार्थी अपेक्षीत होते, त्यापैकी 21 हजार 300 बालकांना लसीकरण करण्यात आले. त्यांना प्रमाणपत्रेही देण्यात आली .तालुक्यात एकुण 335 शाळा आहेत, त्यापैकी वेगवेगळ्या प्राथमिक केंद्राच्या अधिपत्याखालील 140 शाळेत लसीकरण मोहीम राबविली . याकामी त्या त्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सहाय्यक , अंगणवाडी सेविका ,आशाताई हे परिश्रम घेत आहेत.

लसीकरण केल्यानंतर एखाद्या बालकाला त्रास होऊ लागला तर प्रथमोपचारासाठी चार बालरोग तज्ञांची नेमणुक केली असून, एक डॉक्टर मोहोळच्या ग्रामिण रुग्णालयात तळ ठोकुन आहेत. तातडीने रुग्णालयात पोचण्यासाठी 108 व 102  या रुग्णवाहिका तैनात ठेवल्याचेही डॉ पाथ्रुडकर यांनी सांगीतले. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अधिपत्याखालील लसीकरण केलेल्या शाळांची संख्या  पुढील प्रमाणे.
शिरापूर  एकुण 21 शाळा
नरखेड   15 शाळा 
अनगर     21 शाळा 
पाटकुल   30 शाळा 
कामती       17 शाळा 
बेगमपुर     7 शाळा 
कुरुल       20 शाळा 
अंकोली       9 शाळा 

Web Title: vaccination to 21 thousand children in mohol