एका क्लिकवर समजणार लसींची माहिती

 Vaccine information, with one click
Vaccine information, with one click

नगर : आरोग्य विभागाने कात टाकली असून, आता या विभागातील लसींची माहिती एका क्लिकवर तालुक्‍यासह राज्यातील अधिकाऱ्यांना मोबाईल व संगणकाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तसेच, तापमान सनियंत्रण प्रणालीही आरोग्य विभागातर्फे लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


जिल्हा परिषदेची 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 555 उपकेंद्रे आहेत. तसेच, एक जिल्हा रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालये व 24 ग्रामीण रुग्णालये व महापालिका हद्दीतील रुग्णालयांसह जिल्हा रुग्णालय व 
जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा दिल्या जात आहेत. यांपैकी 154 ठिकाणांवरून विविध प्रकारचे लसीकरण केले जाते. या सर्व ठिकाणी लसी ठेवण्यासाठी फ्रीजची व्यवस्था करण्यात आली.

बऱ्याच वेळी विजेच्या भारनियमनामुळे तापमान कमी-जास्त झाल्यानंतर लसी खराब होण्याच्या घटना घडत होत्या. अशा घटना घडू नयेत म्हणून आता आरोग्य विभागाने कडक पावले उचलली आहेत. तापमान सनियंत्रण प्रणालीही सुरू केली आहे.

या प्रणालीच्या माध्यमातून लसी ठेवलेल्या फ्रीजमधील तापमानाची माहिती संबंधित केंद्रातील कर्मचारी व तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्तरावरील तंत्रज्ञ, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी आदींना समजणार आहे. 


जिल्ह्यातील 154 ठिकाणी शीतसाखळी केंद्रांत ही प्रणाली सुरू करण्याचे काम सुरू आहे. या प्रणालीमुळे कोणत्या केंद्रावर किती लसी उपलब्ध आहेत, याची माहिती सर्वांना एका क्‍लिकवर मिळेल. महापालिका प्रशासनाच्या रुग्णालयासह जिल्हा रुग्णालय व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग, नगर तालुक्‍यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही तापमान सनियंत्रण प्रणाली सुरू झाली आहे. उर्वरित तालुक्‍यांमध्ये लवकरच ही प्रणाली सुरू होणार आहे. 

लसी खराब होणे टळणार 

तापमान नियंत्रित न राहिल्याने बऱ्याच वेळा लसी खराब होत होत्या. मात्र, आता तापमान सनियंत्रण प्रणाली सुरू केल्याने लसी खराब होण्याच्या घटना टळणार आहेत. 

तापमानावर लक्ष 

लसी ठेवलेल्या फ्रीजमधील तापमान दोन ते आठ अंश सेल्सिअस (प्लस) असणे गरजेचे आहे. यापेक्षा जर तापमान कमी झाले व जास्त झाले, तर लसीची गुणवत्ता कमी होते. तापमान सनियंत्रण प्रणाली फ्रीजमधील तापमान दर्शविते. 

लसींची माहिती तातडीने उपलब्ध होणार

तापमान सनियंत्रण प्रणाली सुरू झाली आहे. त्याचे काम नगर शहरासह नगर तालुक्‍यात पूर्ण झाले असून, आता जिल्ह्यातील उर्वरित तालुक्‍यात ही प्रणाली सुरू होत आहे. यामुळे लसींची माहिती तातडीने उपलब्ध होणार आहे. 
- डॉ. संदीप सांगळे,  जिल्हा आरोग्याधिकारी, जिल्हा परिषद 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com