esakal | लस खरी की खोटीच्या शंकाना ऊत! गैरसमज असल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccination

या मोहिमेंतर्गत निपाणी तालुक्यात पहिला डोस २६ हजार ८५१ तर दोन्ही डोस १९ हजार ६१ नागरिकांनी घेतला आहे.

लस खरी की खोटीच्या शंकाना ऊत! गैरसमज असल्याचा डॉक्टरांचा निर्वाळा

sakal_logo
By
- राजेंद्र हजारे

निपाणी ( बेळगाव): निपाणी तालुक्यात जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसींचा वापर सुरू आहे. शहर आणि ग्रामीण भागात आरोग्य विभागामार्फत मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत निपाणी तालुक्यात पहिला डोस २६ हजार ८५१ तर दोन्ही डोस १९ हजार ६१ नागरिकांनी घेतला आहे. त्यातील अनेकांना ताप किंवा अंग, डोकेदुखीचा त्रास झालेला नाही. तर काहींना अंग, ताप, डोकेदुखीचा त्रास झालेला आहे. त्रास झाल्यानंतरच परिणामकारकता असते, असा अनेकांचा समज आहे. परंतु आरोग्य विभागाने याला दुजोरा दिलेला नाही.

हेही वाचा: निपाणी : दुचाकींच्या धडकेत एक ठार तीन जखमी

व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे कोणाला लसीचा त्रास होऊ शकतो, तर कोणाला होऊ शकत नाही. ताप आला तरच लसीची परिणामकारकता अधिक आहे, असे म्हणणे गैरसमजच असून अज्ञानातून ही चर्चा होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. निपाणी तालुक्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे अठरा वर्षापुढील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

हेही वाचा: निपाणी - महापुरात स्थलांतरावेळी शेतकऱ्याचा बळी, अथणीतील घटना

कोविशिल्डचा त्रास अधिक

सद्यस्थितीत कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसी दिल्या जात आहेत. ज्यांनी कोविशिल्ड लस घेतली, त्यांना कोव्हॅक्सिनच्या तुलनेत जास्त त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. कोविशिल्ड लस घेतल्यानंतर बहुतांश लोकांना ताप येऊन गेल्याचे दिसून आले. या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणा-या क्वचितच नागरिकांना त्रास झाल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा: निपाणी : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी; वाहतूक बंद

'व्यक्ती तितक्या प्रकृत्ती असतात. त्यामुळे ताप, अंग व डोकेदुखीचा कोणाला त्रास होतो, तर कोणाला होत नाही. त्यामुळे लसीची परिणामकारकता नाही, असे म्हणणे हा गैरसमज आहे. तालुक्यात वापरण्यात येत असलेल्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे कोणी असा गैरसमज करून घेऊ नये.'

-डॉ. व्ही. व्ही. शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी, चिक्कोडी

loading image
go to top