साेलापूर : वडापूर बंधाऱ्याचा भराव गेला वाहून

हुकूम मुलाणी 
शुक्रवार, 16 ऑगस्ट 2019

 तालुक्यातील सिद्धापूरजवळील वडापूर बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा बंधारा रिकामा होऊन  हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे.

मंगळवेढा : तालुक्यातील सिद्धापूरजवळील वडापूर बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्यामुळे हा बंधारा रिकामा होऊन  हजारो हेक्टरवरील शेती उद्ध्वस्त होणार असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त केली जात आहे. जोपर्यंत हा वाहून गेलेला भराव नीट केला जात नाही तो भागातील वाहतूक बंद राहणार आहे.

दरम्यान, उजनी व वीर धरणातील ज्यादा  झालेले पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नदीकाठी पूरपरिस्थिती निर्माण झाली. वडापूर बंधारा भरून वाहत असल्यामुळे सिद्धापूर ते वडापूर या दोन गावाचा संपर्क तुटल्यामुळे या भागातील मंगळवेढा-दक्षिण सोलापूर या दोन तालुक्याचे दळणवळण थांबले होते.

अशा परिस्थितीत आज नदीपात्रात पाणी कमी  झाल्यामुळे बंधाऱ्याच्या खाली पाणी जाऊ लागताच नागरिकांच्या बंधाऱ्याची पूर्वेकडे बाजू वाहून गेल्याचे लक्षात आले. जोपर्यंत हा वाहून गेलेला भराव नीट केला जात नाही तो भागातील वाहतूक बंद राहणार आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी बेगमपुरहून जाताना जादा पैसे मोजावे लागते. त्यामुळे या वाहून गेलेल्या बंधाऱ्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे.  अन्यथा बंधाऱ्यातील पाणी पूर्ण रिकामी होऊन बंधारा कोरडा पडल्यास या भागातील शेतकर्यानी काढलेले कर्ज फिटणार नसल्याने शेतकर्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार आहे. 

बंधाऱ्याच्या वाहून गेलेल्या भरावाची दुरुस्ती तात्काळ  न केल्यास बंधाऱ्यात पाणी शिल्लक राहणार नाही. परिणामी शेतकऱ्यांना मोठ्या संकटांस सामोरे जावे लागेल. हे संबंधित खात्याने बंधाऱ्यांची दुरुस्ती तातडीने करणे आवश्यक आहे याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे मोठे परिणाम या भागातील शेतकऱ्यांना व शेती उजाड होण्यास कारणीभूत ठरणार आहे.
- अनिल बिराजदार 

पुराच्या पाण्यातील वेगामुळे बंधार्‍याची एक बाजू वाहून गेली असून, प्लड डॅमेजमधूनच दुरुस्तीचे अंदाजपत्रके तात्काळ करून भविष्यात होणारी पाणी गळती रोखण्याकडे लक्ष देण्यात येईल. -सिद्धेश्वर काळुंगे उप अभियंता भीमा कालवा

 या भागातील शेती व शेतकरी टिकवण्यासाठी बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेल्याचा प्रकार अधीक्षक अभियंता यांच्या कानावर घातला असून, तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या. -भारत भालके, आमदार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vadapur bandhara is collapse in solapur district