विरोधकांचे "मुंगेरीलाल के हसीन सपने' 

Vadettiwar criticizes opponents
Vadettiwar criticizes opponents

शिर्डी  : "माजी मंत्री पंकजा मुंडे वजनदार और समजदार है. जिसने उसका "गेम' किया, उसका "नेम' वो लाएगी,' अशा शब्दांत कॉंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी मुंडे यांचे समर्थन केले. 

""महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल. त्यासाठी आज साईबाबांकडे प्रार्थना केली. सरकार टिकणार नाही, हा विरोधकांचा अपप्रचार आहे. त्यासाठी त्यांचे काही जण पाण्यात देव बुडवून बसले आहेत. "मुंगेरीलाल के हसीन सपने' ते पाहत आहेत. आमचे कुणीही भाजपकडे जाणार नाही, उलट त्यांचेच कोण कोण येतात, याची वाट पाहत आहोत,'' असा दावाही त्यांनी केला. 

तो देशासाठी "काळा दिवस'

वाढदिवसानिमित्त वडेट्टीवार यांनी आज सहकुटुंब येथे येऊन साईदर्शन घेतले. नंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर झाला, तो देशासाठी "काळा दिवस' होता. शिवसेनेच्या या संदर्भातील भूमिकेचा येथील सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. समान विकास किमान कार्यक्रमांवर आम्ही काम करणार आहोत.''

भाजपने कर्ज वाढवलं

""भाजपने राज्याची वाट लावली. राज्यावर बेसुमार कर्ज वाढवलं. हा प्रकार म्हणजे कर्ज काढून बायकोला दागिने करण्यासारखा व उत्पन्न न वाढविता श्रीमंती दाखविण्यासारखा होता. "आयजीच्या जिवावर बायजी उदार' अशी भाजपची अवस्था होती. भाजपचं हिंदुत्व "आरएसएस'चं हिंदुत्व आहे. ते देशासाठी विघातक आहे. शिवसेनेचे हिंदुत्व मात्र सर्वसमावेशक आहे. शिवसेनेवर टीका करणाऱ्या भाजपने काश्‍मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबर कशी युती केली,'' असा सवालही वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. 

शेतकऱ्यांसाठी योजनांत थोडी कपात

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीने सरकारवर आणखी कर्जाचा बोजा पडणार नाही का, या प्रश्‍नावर वडेट्टीवार म्हणाले, ""राज्यात पाच वर्षांत 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांसाठी काही योजनांत थोडी कपात करता येईल.'' साई संस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी वडेट्टीवार यांचा सत्कार केला. सुरेश थोरात, सचिन चौघुले, रवींद्र कोते, श्रीकांत मापारी, राजेंद्र निर्मळ, किरण थोरात आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com