ऑफलाइन फॉर्ममुळे शिष्यवृत्ती रखडली

आयाज मुल्ला
गुरुवार, 13 जुलै 2017

मुस्लिम समाजातील ४६ विद्यार्थिनी वंचित

वडूज - खटाव, माण, कोरेगाव तालुक्‍यांतील मुस्लिम समाजातील युवतींच्या भवितव्यावर ऑनलाइन-ऑफलाइनच्या कामातील सावळागोंधळ बेतला आहे. दिल्लीच्या मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने मुस्लिम समाजातील युवतींना दर वर्षी दिली जाणारी शिष्यवृत्ती यावर्षी ऑफलाइन फॉर्म भरल्याचे कारण देत रखडवण्यात आली आहे. ऑफलाइन फॉर्ममुळे या तिन्ही तालुक्‍यांतील ४६ गुणवंत विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीपासून वंचित राहावे लागले आहे.

दहावी परीक्षेत ७५ टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या मुस्लिम समाजातील विद्यार्थिनींना मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्ती दिली जाते. दर वर्षी सहा हजार रुपयांप्रमाणे दोन वर्षे ही शिष्यवृत्ती मिळते. महाराष्ट्र मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष हाजी निजामभाई आत्तार (फलटण), हाजी राजूभाई आत्तार (कोल्हापूर) यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्‍यामध्ये सचिव महंमदशरीफ आत्तार, संचालक जाफरअल्ली आत्तार (वडूज), तालुकाध्यक्ष अमिन आत्तार हे मुस्लिम समाजातील गुणवंत युवतींना शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करतात. २००८- ०९ पासून आतापर्यंत तालुक्‍यातील २०० ते २५० विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे. 

गेल्या वर्षी ऑक्‍टोबर २०१६ मध्ये खटाव, माण, कोरेगाव तालुक्‍यांतील ४६ विद्यार्थिनींचे शिष्यवृत्तीचे प्रस्ताव मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशनच्या दिल्ली येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांचा अवधी उलटला, तरी संबंधित विद्यार्थिनींना ही शिष्यवृत्ती मिळाली नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी फाउंडेशनच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता फॉर्म ऑफलाइन भरले असल्याने ही शिष्यवृत्ती नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: vaduj satara news scholarship is canceled due to offline form