वैभव पाटलांचे सुहास बाबरांना २०१९ च्या रिंगणात उतरण्याचे खुले आव्हान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

विटा - जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर विटा शहर व खानापूर तालुक्‍यातील विविध कार्यक्रमांत विट्यातील दादागिरी मोडून काढायची आहे, अशी टीका आमच्यावर करीत आहेत. अनिलभाऊंनी केलेल्या कामाचे श्रेय तुम्ही स्वत: घेऊ नका. तुम्ही तुमचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवा. सवंग लोकप्रियतेसाठी एखाद्याला बदनाम करणं सोडा. मी निवडणुकीला तयार आहे. तुमच्यात धमक असेल तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उतरून दाखवा, असे खुले आव्हान माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सुहास बाबर यांना पत्रकार परिषदेत दिले. 

श्री. पाटील म्हणाले, ‘‘ज्या कार्यकर्त्यांवर दादागिरी केली  ते दाखवून द्या. लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करणे हा खेळ जुनाच आहे. प्रत्येक निवडणुकीत एकच फंडा चालतो आणि या निवडणुकीला कर्तृत्वाचा फंडा चालेल. सदाभाऊंनी २०१९ चे निवडणुकीचे मैदान मारणार म्हटल्यावर तुम्हाला वाढदिवसाचे एवढे मोठे कार्यक्रम घ्यावे लागत आहेत हे आश्‍चर्य व्यक्त करण्यासारखे आहे. तुम्ही कुस्त्यांचा कार्यक्रम घेतला. भारत विरुद्ध जॉर्जीया अशी कुस्ती होती. जमलेल्या गर्दीमुळे तुम्हाला वाटत असेल आम्ही मैदान मारलं. लोक देशप्रेमापोटी कुस्ती पहाण्यास आले होते. अजून निवडणुकीला वेळ आहे. लोकं अजून मतदान करणार आहेत.’’ 

ते म्हणाले, ‘‘तुमचा आम्ही सलग दोनवेळा पराभव  केला. त्याची तुम्हाला जाणीव असली पाहिजे.  मिळालेल्या सत्तेचा मस्तवालपणा बरा नाही.  विधानसभेला तुमच्याबरोबर असलेले कार्यकर्ते तुमच्यापासून बाजूला होत आहेत. हे कशाचं लक्षण  आहे. टेंभूचे आता जे काम सुरू आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय पाटील यांचेही श्रेय आहे. तुम्ही साडेचार वर्षांत काय काम केलं त्याचा त्यांनी खुलासा करावा, असे त्यांना खुलं आव्हान आहे.’’

या वेळी माजी उपनगराध्यक्ष सचिन जाधव, अविनाश चोथे, संजय सपकाळ, विनोद पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Vaibhav Patil comment

टॅग्स