"वालचंद'च्या जमिनीसाठी खटाटोप

"वालचंद'च्या जमिनीसाठी खटाटोप

सांगली - वालचंद कॉलेजची शंभर एकर जमीन हडपण्यासाठी विजय पुसाळकर यांचा प्यादे म्हणून वापर होतो आहे. कॉलेज आणि एमटीई सोसायटी बळकावण्यासाठी बेकायदा गोष्टी झाल्याचा तत्कालीन पोलिस उपाधीक्षकांचा अहवाल आहे. त्याच्या आधारे कारवाई झाल्यास हे अडचणीत येतील. त्यामुळेच गैरव्यवहार दडपण्यासाठी "एमटीई‘वर प्रशासकाची मागणी केली जातेय, असा आरोप अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत केला. यावेळी प्रा. श्रीराम कानिटकर उपस्थित होते.

ते म्हणाले,""आमची पदे कायदेशीर की बेकायदा, हे न्यायालय ठरवेल. कायद्याने सांगितल्यास लगेच बाहेर पडू, मात्र कुणी सांगतेय म्हणून हटणार नाही. गेली अनेक वर्षे "वालचंद‘चा विकास खुंटलाय. संस्थेच्या जमिनीवर मेडिकल, कृषी कॉलेज; हॉस्पिटल व्हावेत, हे धोंडूमामा साठे यांचे ते स्वप्न होते. सांगलीकरांच्या उपयोगाला या गोष्टी आल्या पाहिजेत. पुसाळकरांना इथली जमीन लाटायची आहे. 85 एकर जमीन गुलाबचंद यांना देण्याचा ठराव त्यांनी केला होता. आम्ही एक गुंठा जमीन हालू देणार नाही.‘‘

ते म्हणाले,""एमटीईवर बेकायदा ताबा घेतला, हाकलून काढले याचा पुरावा द्या. मी राजकीय जीवनातून सन्यास घेईन. सोसायटीचे सहा कोटी काढले, मात्र त्याच्या सुरक्षितपणे ठेव पावत्या केल्या आहेत. पैसे हडपलेले नाहीत. मी मालमत्ता बळकावत असेन तर फौजदारी करा. वालचंद आणि एमटीई प्रकरणी तत्कालीन पोलिस उपाधीक्षक बाळसिंग रजपूत यांचा अहवाल या मंडळींनी दडपला होता. त्या अहवालाच्या आधारे कारवाई झाल्यास ह्यांना अटक होईल. त्यांच्याविरुद्ध खोटे शिक्के, खोटे लेटरहेड बनवल्याचे गुन्हे आधीच दाखल आहेत.‘‘

श्री. कानिटकर म्हणाले,""ऑगस्ट 2011 ची ती सभा 15 जुलैला ठरून नोटीस काढली होती. त्यात पुसाळकर व अन्य मंडळींच्या सभासदत्वावर चर्चा होणार होती. त्याआधी यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन आम्हाला हटवले. कायद्यानुसार नव्याने अध्यक्ष निवड व्हायला हवी. एकाला हटवले अन्‌ दुसऱ्याला बसवले. त्यामुळे ती बैठक आणि आम्हाला हटवणे सारेच बेकायदा होते. आमची पदे कायम होती, त्या अधिकाराने सभा झाली. नवे संचालक निवडले गेले. धर्मादाय आयुक्तांकडे त्यांची नोंद आहे.‘‘

पक्षाचे जोडे बाहेरच
पृथ्वीराज देशमुख म्हणाले,""मी पक्षाचे जोडे बाहेर काढून इथे येतो. अन्यथा, त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले असते. परिषवाड यांना बाजूला करू, मात्र कायद्यानेच. राज्य सरकार, भाजप पक्ष ह्यांनी माझी बाजू घ्यावी, असे म्हणणार नाही.‘‘ दीपक शिंदे अदखलपात्र आहेत, असा टोला त्यांनी हाणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com