एक स्वप्न आहे माझं...तुझ्याबरोबर शेवटपर्यंत जगण्याचं...! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - तो माझ्यावर खूप प्रेम करतो... पुण्याहून माझ्यासाठी जॉब सोडून परत आला आहे; पण मध्यंतरी खटकलं आणि दोघांचाही संवाद तुटला. आता सहा महिन्यांनंतर मला माझी चूक समजली आहे. मी त्याला खूप "मिस' करतेय; पण कॉन्टॅक्‍ट होत नाही. काय करू? हा एक प्रातिनिधिक प्रश्‍न. पण प्रेम व्यक्त करण्यासाठी काय करू, रुसव्या-फुगव्यातून मार्ग काढण्यासाठी किंवा अगदी तिला व्हॅलेंटाइन गिफ्ट काय देऊ, अशा प्रकारचे सल्ले मिळवण्यासाठी आता येथील तरुणाईला सोशल मीडियाचा आधार मिळतो आहे. कन्फेशन कॉर्नर, कन्फेशन गाइड अशी विविध पेजिस त्यासाठी ऑनलाइन उपलब्ध असून त्यावर तरुणाई व्यक्त होऊ लागली आहे. 

माझे त्याच्यावर प्रेम आहे; पण त्यानं माझं अकाउंट ब्लॅक केलंय... एक मुलगी आहे. बघून हसते पण तरीही नाही म्हटली... माझं त्याच्यावर भरपूर प्रेम आहे. त्याचे प्रेम मला समजते; पण त्याला माझे त्याच्यावर प्रेम आहे असे वाटत नाही... माझं एका मुलीवर खूप प्रेम आहे. तिचंही माझ्यावर आहे; पण तिच्या दुसऱ्या मैत्रिणीने काल मला प्रपोज केलंय. सगळाच गुंता झालाय.... प्रेमाच्या दुनियेत अशा असंख्य "कन्फ्युजन्स' निर्माण होतात आणि मग "कन्फ्युजन ही कन्फ्युजन है- सोल्यूशन का पता नही' अशी परिस्थिती निर्माण होते. मित्र-मैत्रिणींशी काही गोष्टी शेअर करून त्यावर मार्गही काढला जातो; मात्र काहींना अशा गोष्टी मित्र-मैत्रिणींशी शेअरही कराव्या वाटत नाहीत. मग आलेल्या एकटेपणातून कुठेच मन रमत नाही... या साऱ्या पार्श्‍वभूमीवर कुणी तरी आपल्याला सल्ला द्यावा; पण आपले नावही कुणाला समजता कामा नये, अशी मानसिकता बनते. मात्र तसा पर्याय उपलब्ध नव्हता. नेमकी हीच परिस्थिती लक्षात घेऊन कन्फेशन कॉर्नरसारखी संकल्पना पुढे आली आणि नाव न जाहीर करता सल्ला मागा, तुम्हाला नक्की मार्ग काढून देऊ, असे आवाहन केले गेले. अशी तरुणाई मग धडाधडा अशा पेजिसवर व्यक्त होऊ लागली आहे. 

अशी आहे संकल्पना 
तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो तुम्ही ऍडमिनला मेसेज करायचा. ऍडमिन या प्रॉब्लेमविषयीची पोस्ट संबंधित पेजवर टाकेल आणि कमेंटच्या माध्यमातून तुम्हाला आपोआप त्या प्रॉब्लेमवर मात करण्याचे विविध पर्याय पुढे येतील. त्यातील तुम्हाला जो पर्याय योग्य वाटतो तो तुम्ही निवडू शकता. या साऱ्या प्रक्रियेत तुमचे नाव कुणालाही माहिती होणार नाही, याची नक्कीच खबरदारी घेतली जाते.

Web Title: valentines day kolhapur