संघ लावतोय मराठा-दलितांमध्ये भांडण- वामन मेश्राम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

समाजाला भडकविण्याचे काम संघाचे

कोल्हापूर- "मराठा क्रांती मोर्चातून केलेली ऍट्रॉसिटी रद्द करा अशी मागणी चुकीची असून ऍट्रोसिटी कायद्याचा काना, मात्रा, वेलांटीही बदलून देणार नाही. मराठ्याच्या विरोधात दलितांना व दलितांच्या विरोधात मराठ्यांना भडकविण्याचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करीत आहे,' असा आरोप भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी आज (बुधवार) येथे केला.

एकच पर्व बहुजनसर्व असा नारा देत बहुजनाच्या अमाप सहभागाने विराट मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकात झालेल्या सभेत श्री. मेश्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कारभार बाम्हणी वर्चस्वाखाली सुरू असल्याची खरमरीत टिकाही त्यांनी केली.
गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या विविध पातळीवर प्रसार प्रचारातून बहुजन समाजातील विविध घटकांनी एकत्र घेऊन ऍट्रॉसिटी ऍक्‍ट अधिक कडक करावा, ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. त्यासाठी 288 संस्था, समाज संघटनांच्या सहभाग राहीला तसेच हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नाही, असे विविध वक्‍त्यांनी जाहिर केले.

यामोर्चाला महिलांचाही मोठा सहभाग लाभला, ही या मोर्चाची खास वैशिष्ठ्य ठरली. सकाळी 9 वाजल्या पासून शहराच्या चारही भागातून रस्त्यावर नागरिक मोर्चा स्थळी येऊ लागले. हातात निळे, पिवळे, हिरवे, भगवे झेंडे घेऊन विविध समाज संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्त्यांपासून ते महिला वर्गही गट करून मोर्चा स्थळी आले. कसबा बावडा, लक्षतिर्थ वसाहत, राजेंद्रनगर, विचारेमाळ, सदर बाजारसह शहराच्या अन्य भागातून कार्यकर्ते रॅली काढून येथे आले. इचलकरंजी, पन्हाळा, चंदगड, आजरा येथून मोठ्या संख्येने नागरिक गटागटाने येथे आले. सकाळपासून ढगाळ वातावरणात ऊन नसल्याने आंदोलकांमध्येही उत्साहत होता. शहरातील मोर्चा स्थळ गर्दीने फुलले होते. सुरवातीला गती काहीशी कमी होती. मात्र, साडे दहा वाजल्यानंतर दसरा चौक गर्दीने भरून गेला, यानंतर प्रत्यक्ष सभेला सुरवात झाली.

Web Title: vaman meshram attack on rss